शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरचालकांचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 18, 2014 14:43 IST

शासनाने मोबाइल टॉवर संदर्भात जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार शहरातील १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनी मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत.

धुळे : शासनाने मोबाइल टॉवर संदर्भात जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार शहरातील १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनी मंजुरीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. शहरात बीएसएनएलसह विविध खासगी कंपन्यांचे सुमारे १0१ मोबाइल टॉवर आहेत. या कंपन्यांनी शहरातील इमारतींवर टॉवरची उभारणी केली आहे. त्यात शहरातील मनपाच्या देवपूर प्रभागांतर्गत ३४, अशोकनगर प्रभागांतर्गत २१, सुभाषनगर प्रभागांतर्गत १९ व शाळा क्रमांक ५ च्या प्रभागांतर्गत २७ अशा १0१ टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. हे टॉवर पाडण्याची कारवाई मनपातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु काही टॉवरचालक न्यायालयात गेल्याने कारवाई अपूर्ण राहिली होती. त्यात टॉवर संदर्भात मार्च २0१४ मध्ये नव्याने धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार टॉवरचालकांना परवानगी घेणे बंधनकारक आहे. आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या धोरणाची माहिती टॉवरचालकांना देण्यात आली होती. तरीही १0१ टॉवरपैकी केवळ १२ टॉवरचालकांनीच मनपाच्या नगररचना विभागाकडे नवीन धोरणानुसार प्रस्ताव दाखल केले आहेत. मनपाचे नुकसानमोबाइल कंपन्यांचे महिन्याला कोट्यवधी रुपयांचे ट्रान्झेक्शन होते. त्यात त्यांना एक ते दीड कोटीचा नफा होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातआहे. तसेच एखाद्या मोबाइल कंपनीला टॉवरउभे करायचे असेल, तर त्यांनी महापालिकेची अधिकृतपणे परवानगी घेणे आवश्यकआहे. महापालिकेने परवानगी दिल्यावर वीज वितरण कंपनीकडून त्यांना वीज जोडणी दिली जाते. परंतु अनेक कंपन्यांनी परस्पर टॉवर उभारले आहेत. त्यामुळे महापालिकेला त्यांच्यापासून कोणतेही उत्पन्न मिळत नाही.

----------------

शासनाने २४ मार्च २0१४ रोजी मोबाइल टॉवर उभारणीसंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. यात परवानगी घेण्यासाठी विविध अटी व शर्तींचा समावेश करण्यात आलाआहे. ज्या परिसरात टॉवर उभारले आहे किंवा उभारायचे आहे, त्या परिसरातील ७0 टक्के नागरिकांचा नाहरकत दाखला जोडणे आवश्यक आहे. या अटीमुळेच टॉवरचालकांची मोठी अडचण झाली आहे. शहरातील सर्व मोबाइल टॉवरचालकांना नवीन धोरणानुसार परवानगी घेण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यातील केवळ १२ टॉवरचालकांचे प्रस्ताव दाखल झाले आहे. अन्य उर्वरित टॉवरचालकांना पुन्हा नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. - सुभाष विसपुते, नगररचनाकार, महापालिका, धुळे