शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शेकडो हेक्टरवरील कापूस पीक आडवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:15 PM

कापडणे : उत्पादनात येणार मोठी घट, कापसाची प्रत खालावल्याने दरावर परिणाम

कापडणे : कापडणेसह धनुर लोनकुटे, तामसवाडी, कौठळ, बिलाडी, न्याहळोद, नगाव, धमाणे, देवभाणे, सरवड, सोनगीर आदी गावांसह परिसरात ७ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अर्धा तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाने येथील सोनगीर रस्त्यावरील शेत शिवारातील दिलीप आत्माराम पाटील व विलास आत्माराम पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे डोलदार कापूस पीक जमीनदोस्त झाले.संपूर्ण शेतात कापूस पीक आडवे पडले असून पिकाला सडू लागले आहे. यामुळे शेकडो हेक्टर जमिनीवरील शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कापूस पिकासह खरीप हंगामातील कापणी व काढणीला आलेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, तुर, सोयाबीन, फळबागा, भाजीपालावर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ज्वारी, बाजरी, मका या पिकांची कणसे जास्त पाण्यामुळे काळी पडून धान्याला कोंब फुटले आहेत तर गुरांसाठी असलेला चाराही शेतातच सडून खराब झाला आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.अतिवृष्टीमुळे यंदा खूप मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सध्या परतीचा पाऊस गेल्याने कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. सर्व शेतकºयांनी सोबतच कापूस वेचणीला सुरुवात केल्याने मजूर टंचाई निर्माण झाल्याने मजुरीचे दर वाढले आहेत. मात्र, कापूस खराब झाल्याने वेचणी मोठ्या फरकाने कमी झालेली दिसून येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यंदा कापसाची गुणवत्ता घसरल्याने त्याचा विपरीत परिणाम कापसाच्या दरावर होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नाही. तसेच पिकासाठी केलेल्या काबाडकष्टाचे मोलही मिळणार नाही. यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत.एकिकडे उत्पन्न बुडाले दुसरीकडे गुरांच्या चाºयाचा प्रश्न आ वासून उभा आहे, अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. यामुळे शासनाकडून प्रत्यक्ष मदत केव्हा मिळते, यावरच रब्बीचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Dhuleधुळे