सत्काराने भारावले रुग्णालयातील कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:27+5:302021-06-16T04:47:27+5:30

दोंडाईचा येथे डॉ. जयेश ठाकूर यांच्या शिवकृपा हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. येथील कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत ...

Hospital staff overwhelmed with hospitality | सत्काराने भारावले रुग्णालयातील कर्मचारी

सत्काराने भारावले रुग्णालयातील कर्मचारी

दोंडाईचा येथे डॉ. जयेश ठाकूर यांच्या शिवकृपा हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात आले होते. येथील कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार केले. या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चा माजी प्रदेश सरचिटणीस सयाजीराव बागल यांच्या परिवारातर्फे व निमगूळ गावाच्या वतीने करण्यात आला. यावेळी भारती बागल, मृणालिनी बागल दहीहंडे, ऋषिकेश बागल, डॉ. विरेंद्र बागल, निमगूळ ग्रामपंचायतीचे गटनेते नंदलाल बागल हे उपस्थित होते.

यावेळी डॉ. जयेश ठाकुर, निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र देशमुख, डॉ. चेतन पाटील, तंत्रज्ञ तुषार गिरी तसेच रुग्णालयातील कर्मचारी भगवान पाटील, आसिफ पठाण, युसूफ पठाण, हेमंत पाटील, आप्पा शेवाळे, रुपाली पाटील, ऋषिकेश पाटील, हर्षल बोरसे, मानव राजपूत आणि सफाई कर्मचारी चेतन लोट आदींचा शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे रुग्णालयातील कर्मचारी भारावले होते.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नंदलाल बागल यांनी केले.

Web Title: Hospital staff overwhelmed with hospitality