त्या दवाखान्यावर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 10:28 PM2020-04-08T22:28:16+5:302020-04-08T22:28:54+5:30

आयुक्तांना निवेदन : दंतशल्य चिकीत्सक संघटनेची मागणी

 The hospital should take action | त्या दवाखान्यावर कारवाई करावी

dhule

Next

धुळे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे़ त्यासाठी सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले आहे़ शहरातील काही दवाखान्यात नियमांचे पालन केले जात नाही, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन आयुक्त अजिज शेख यांच्याकडे दंतशल्य चिकीत्सक संघटनेतर्फे देण्यात आले़
देशात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ सुदैवाने जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेला नाही़ संसर्गजन्य आजार रोखण्यास इंडियन डेंटल असोशिएशन शाखा कटीबद्ध आहे़ शासनाकडून प्रादूर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असतांना शहरातील काही दंत शल्यचिकीत्सक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दंत आरोग्याबद्दल कुठलेही आवश्यकता नसतांना नियमित दंत्तसेवा सुरू ठेवून दवाखान्यात गर्दी करीत आहे़ दंत्ततज्ञांच्या संबंध थेट रूग्णांच्या तोंडाशी येतो़
युनायटेड स्टेटने कोरोनापासून सर्वाधिक संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या सेवांची यादी जाहीर केली आहे़ त्यात दातांचे दवाखान्याचा समावेश करण्यात आला आहे़
सध्या सुरू असलेले काही दातांच्या दवाखान्यात कोणत्याही प्रकारचे नियमांचे पालन केले जात नाही़ अशा व्यक्ती किंंवा आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दंत शल्य चिकीत्सक संघटनेचे सचिव डॉ़ नितीन पाटील यांनी आयुक्त अजिज शेख यांना दिले

Web Title:  The hospital should take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे