दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:07+5:302021-04-07T04:37:07+5:30

प्रधानदेवी हा पाडा ग्रुप ग्रामपंचायत गुऱ्हाळपाणी या अतिदुर्गम क्षेत्रात समाविष्ट आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र वकवाड अंतर्गत ही गावे ...

Health services have not reached remote areas | दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचलीच नाही

दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहचलीच नाही

प्रधानदेवी हा पाडा ग्रुप ग्रामपंचायत गुऱ्हाळपाणी या अतिदुर्गम क्षेत्रात समाविष्ट आहे़ प्राथमिक आरोग्य केंद्र वकवाड अंतर्गत ही गावे मोडतात. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अतिशय दुर्गम, क्षेत्रातील गुऱ्हाळपाणी, प्रधानदेवी, थुवानपाणी, कडईपाणी, पळसपाणी, कोळशापाणी, मोहिदा, शेमल्या, दुर्बळ्या, सितारापाडा अशी जवळपास १० ते १२ पाडे या आरोग्य केंद्राला जोडण्यात आली आहे. परंतु या पाड्यांवर सेवा द्यायला डॉक्टर येत नसल्याने रुग्णांना प्रचंड हाल होत आहेत़. वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची अरेरावी यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे़. आरोग्य यंत्रणाच उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णांना तातडीने तालुक्याच्या ठिकाणी हलवावे लागते. काही महिन्यांपूर्वीच येथे एका गरोदर महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीने बोराडी येथे आणल्याचा गंभीर प्रकार घडला होता.

काही दिवसांपूर्वीच येथील कोरोनासदृश व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही तेथे आरोग्य पथक अद्यापही पोहचले नाही. काही दिवसांपूर्वी येथील एका व्यक्तीला गंभीर अवस्थेत बोराडी येथे खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. डॉक्टरांनी सदर व्यक्तीला कोरोनाचे लक्षण असून ऑक्सिजनचा स्तरही खूप कमी असल्याचे सांगण्यात आले. मात्र वेळेवर उपचार होऊ न शकल्याने त्या व्यक्तीचादेखील मृत्यू झाला

दुर्गम व डोंगराळ भागातील रुग्ण वकवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आवलंबून आहेत़ आदिवासी रुग्णांचे हाल होत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत असून वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांची आरोग्य सेवा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून आहे. प्रधानदेवी येथे तत्काळ आरोग्य पथकाकडून आरोग्य तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Web Title: Health services have not reached remote areas