कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगा- जिल्हाधिकारी संजय यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:22+5:302021-01-19T04:37:22+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी ...

Health department should be vigilant to control the outbreak of corona - Collector Sanjay Yadav | कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगा- जिल्हाधिकारी संजय यादव

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगा- जिल्हाधिकारी संजय यादव

Next

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यादव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.मनीष पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. असे असले, तरी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. लसीकरणास सुरुवात झाली आहे. त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. लसीकरण मोहिमेचा जिल्ह्याच्या पालक सचिव लवकरच आढावा घेतील. त्याचेही परिपूर्ण नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नवले, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मोरे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Web Title: Health department should be vigilant to control the outbreak of corona - Collector Sanjay Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.