शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

्र१३१ वर्ष जुन्या पुलावरून धोकेदायक वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 12:31 PM

ब्रिटीशकालीन मोठा पूल मोगलाईतील पुलाचे कठडे तुटले काजवे पुलाची दुरूस्ती मात्र पथदिवे नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील पांझरा नदीवर तब्बल नऊ छोटे-मोठे पूल असून, त्यापैकी ब्रिटीशकालीन १३१ वर्ष जुना मोठा पूल जवळपास जीर्ण झाला असल्याने यावरून आजही धोकेदायक वाहतूक सुरू आहे. या पुलावरील अवजड वाहतूक दहा वर्षापुर्वी बंद करण्यात आली आहे़ मात्र नियम धाब्यावर बसत सध्या सर्रापणे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले़पांझरा नदीवर १८८९ मध्ये ब्रिटीश शासनाने वाहतुकीसाठी मोठा पूल दगडाने तयार केला होतो़ या पुलाला शंभर वर्षेपूर्ण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या गुणवत्ता अहवालात हा पूल अवजड वाहतुकीस धोकेदायक असल्याचा निष्पन्न झाले आहे़ या पुलावरील अपघात टाळण्यासाठी १० वर्षापूर्वी या पुलावरील अवजड वाहतूक थांबविण्यात आली आहे़ हा पूल धोकेदायक व अवजड वाहतुकीस बंद असल्याबाबत कोणतीही सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेली नाही़ त्यामुळे आजही या पुलावरून सर्रापणे अवजड वाहतूक सुरूच आहे़अन्य पुलांचीही दुरवस्थापांझरा नदीवर नऊ पुलापैकी दोन सार्वजनिक बांधकाम विभाग काही खाजगी, चार पुल मनपाच्या अंतर्गत येतात. त्यापैकी चार पूल वाहतुकीस धोकेदायक ठरत असतांना मनपाकडून दुरूस्तीसाठी कोणत्याही प्रकारची तसदी घेतली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.देवपूरातील गणपती पुलमहापुरामुळे संतोषी माता चौक ते देवपूर भागाला जोडणारा गणपती पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहे़ तर पथदिव्यांचे खांब ही पाण्यात वाहून गेले आहेत़ शाळा, महाविद्यालय, दवाखान्यात जाण्यासाठी हा पूल महत्वाचा असतांना देखील अद्याप या पुलाची दुरूस्ती झालेली नाही़पांझरेवरील परशी पुलचौपाटीजवळ असलेला परशी पुलाजवळ धोकेदायक विहीर आहे़ तसेच हा पूल खालून खलचा आहे़ तर मोगलाईतील ब्रिजकम बंधारा पुलाचे कठडे तुटले असून त्याठिकाणी पथदिवे नाहीत़ सिंधी कॉलनी व नकाणे गावाला जोडणाऱ्या पुलावर खड्डे व काही पथदिवे बंद पडले आहेत़ याच नदीवरील काजवे पुलाची दुरूस्ती मनपाकडून करण्यात आली़ अद्याप या पुलावर पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत़ त्यामुळे नागरिकांनी रात्री पुलावरून वाहतूक करतांना अडचण येते़एकवीरा देवी पूलश्री़एकविरा देवी मंदिर ते जुने धुळे भागाला जोडणार पुलावर स्थिती अद्याप चांगली असली तरी पथदिवे बंद आहेत़ याठिकाणी भाविकांची तसेच जवळच मंगल कार्यालय असल्याने वर्दळ असते़ महिलांची सुरक्षितेच्या दृष्टीने पथदिवे दुरूस्तीची गरज आहे़

टॅग्स :Dhuleधुळे