शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टमनच्या हाती आता हॅण्ड डिव्हाईस

By admin | Updated: April 17, 2017 13:03 IST

पैसे भरण्यासह ते काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही

प्रणव कुमार : जळगावातून सुरुवात
ऑनलाईन लोकमत/गणेश वाघ
भुसावळ, जि. जळगाव, दि. 17- माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत टपाल खात्यानेही कात टाकली असून पोस्टमनच्या हाती आता हॅण्ड डिव्हाईस (ग्रामीण माहिती संप्रेक्षण प्रणाली) दिसणार आह़े पैसे भरण्यासह ते काढण्यासाठी ग्राहकांना टपाल कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही, पोस्टमनच त्यांच्या दारी पोहोचणार असल्याची माहिती  औरगांबाद परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल प्रणव कुमार यांनी येथे दिली़
आगामी दोन महिन्यात जळगावातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली़ पुण्यात या पद्धत्तीचा अवलंब करण्यात आला आह़े
औरंगाबादमध्ये टपाल खात्याची बँक
ग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासाठी टपाल खात्यातर्फे नवनवीन योजना अंमलात आणल्या जात आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादमध्ये टपाल खात्याची बँक लवकरच सुरू होत आह़े इतर बँकांप्रमाणे सर्व सुविधा या बँकेत उपलब्ध असल्यातरी तूर्त कर्ज या बँकेतून उपलब्ध होणार नाही मात्र सर्व बँकांशी ही बँक कनेक्ट असेल़
जळगाव पोस्टातून मिळणार पासपोर्ट
पासपोर्ट वाटपाची क्लिष्ट प्रक्रिया अत्यंत सोपी झाली असून औरंगाबाद येथे प्रतिदिन शंभर अर्ज पासपोर्ट संदर्भात भरले जात आहेत़ आगामी दोन महिन्यात जळगावातून टपाल कार्यालयामधून नागरिकांना पासपोर्टचे वितरण होईल, असेही प्रणव कुमार म्हणाल़े विशेष म्हणजे पासपोर्ट व्हेरिफिकेशन टपाल खात्याचा अधिकारी करणार आह़े केंद्राने ही जबाबदारी टपाल खात्यावर सोपवली आह़े टपाल कार्यालयातून एम्प्लायमेंट सुविधादेखील लवकरच सुरू होणार आह़े