रेमडेसिविर पुरवठाबाबत केंद्राकडून हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:44+5:302021-04-15T04:34:44+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांवर उपचारात अडचणी येत आहेत. रेमडेसिविर ...

Green lantern from the center regarding the supply of remedicivir | रेमडेसिविर पुरवठाबाबत केंद्राकडून हिरवा कंदील

रेमडेसिविर पुरवठाबाबत केंद्राकडून हिरवा कंदील

संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांवर उपचारात अडचणी येत आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुडवडा असल्याने, रुग्णांच्या नातेवाइकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. औषध आणि ऑक्सिजन अशा दोन्हींच्या टंचाईचा महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवर ताण निर्माण झाला असल्याने, ही अतिशय गंभीर स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळेच तातडीने महत्त्वाचे पाऊल उचलले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी डॉ.व्ही.जी. सोमानी, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांना निर्देश देऊन सर्व कंपन्याशी चर्चा करण्यात आली. आणि येत्या ३ ते ४ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल, असे खासदार डॉ.सुभाष भामरे यांना आश्वासित केले आहे.

खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी धुळे जिल्ह्यासह राज्यातील कोरोना स्थितीवर लक्ष वेधून ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा संपूर्ण महाराष्ट्रात सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत केंद्राकडूनही मदतीचा हात मिळले, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. ही चर्चा समाधानकारक ठरली.

Web Title: Green lantern from the center regarding the supply of remedicivir