शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाचा ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

मालपूरसह परिसरातील शेतकरी कधी अवकाळी, तर कधी अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडतात, तरीदेखील उधार उसनवार करून वेळप्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून ...

मालपूरसह परिसरातील शेतकरी कधी अवकाळी, तर कधी अतिवृष्टीच्या दुष्टचक्रात सापडतात, तरीदेखील उधार उसनवार करून वेळप्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे पीक कर्जाची परतफेड वेळेवर करतात. अशा शेतकऱ्यांना हे सरकार प्रोत्साहन अनुदानासाठी दोन वर्षांपासून ठेंगा दाखवत आहे. त्यांची ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा हवेत विरली.

फडणवीस सरकारने सातत्याने अभ्यास करून अटी व शर्तींचा डोंगर उभा करत कर्ज माफी दिली. यामुळे महाविकास आघाडी सरकार सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ करेल, अशी आशा होती. मात्र, सप्टेंबर २०१९पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत थकीत कर्ज आहे, अशाच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. यामुळे नियमित कर्ज फेड करणाऱ्या व दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे सरकारने तेव्हा नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार, असे जाहीर केले. मात्र, त्याचे काय झाले, असे येथील शेतकरी आता प्रश्न करताना दिसून येत आहे. हे अनुदान न दिल्यास कर्ज परतफेड करावी की नाही, याचा विचार करावा लागेल. यामुळे थकबाकी वाढल्यास नवल वाटायला नको.

प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली, हा गुन्हा केला का? अशा संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकरी वर्तुळात व्यक्त होत असून, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकारने गांभीर्याने बघावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रतिक्रिया......

शासनाला नियमित कर्जफेड करणाऱ्यांची थोडी जरी चिंता असेल, तर भविष्यात नियमित कर्ज फेड करणाऱ्यांचा विचार करावा लागेल. उधार उसनवारीने, प्रसंगी पदरांचे दागिने गहाण ठेवून वेळेवर कर्ज भरले हा गुन्हा केला का, दोन वर्षे झाली तरी प्रोत्साहन अनुदानाची दमडीही आली नाही. कोरोनाच्या या कठीणप्रसंगी प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रामाणिकपणा दाखवा.