महापालिकेल ५० पीपीई किटची दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 22:12 IST2020-04-15T22:12:00+5:302020-04-15T22:12:30+5:30

अनुप अग्रवाल यांची मदत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीपीई कीटची होणार महत्वाची मदत

Gift of 5 PPE kit from the municipality | महापालिकेल ५० पीपीई किटची दिली भेट

dhule


धुळे : महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी़ यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्यातर्फे महापालिकेला ५० पीपीई किट भेट दिल्या़
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांच्या उपस्थित आयुक्त अजिज शेख यांच्याकडे या किट देण्यात आल्या. याप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, अतिरिक्त उपायुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहायक आयुक्त विनायक कोते, तुषार नेरकर, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार, डॉ. बी.बी. माळी आदींसह अधिकारी उपस्थित होते. अनुप अग्रवाल यांनी आई विमलबाई ओमप्रकाश अग्रवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त या किट भेट दिल्या.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी देण्यात आलेल्या किट महत्वपूर्ण ठरणाºया आहेत़

Web Title: Gift of 5 PPE kit from the municipality

टॅग्स :Dhuleधुळे