शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून रात्रीतून केली विंधन विहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:33 IST

खुडाणेत तीव्र पाणीटंचाई : दुष्काळी स्थितीत ग्रामस्थांना दिलासा

निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाण्याअभावी गावातील नळ पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद पडला आहे. यामुळे खुडाणे ग्रामपंचायतीची तारांबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून सोमवारी रात्री तातडीने विंधन विहीर करण्यात आली. यामुळे गावास काहीसा दिलासा मिळाला आहे.दुष्काळी स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना खुडाणे ग्रामपंचायत प्रशासनाची तारांबळ उडालेली बघून गावकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली आणि कुपनलिका करण्यासाठी हातभार लावला. बोअरवेलला बऱ्याच प्रमाणात पाणी लागल्याने या भागातील पाणी समस्या काही अंशी सुटणार आहे.यंदा सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. खुडाणे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर व बोअरवेल आटल्याने गावात पाणीपुरवठा कसा करावा, या विवंचनेत ग्रामपंचायत प्रशासन असताना गावातील वार्ड क्र. चार मधील सामाजिक कार्यकर्ते देवाजी वंजारी व जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून निधी जमा केला. त्यात ग्रामपंचायतीने देखील रकमेची भर टाकली व बोअरवेल केला. सुदैवाने या बोअरवेलला बºयापैकी पाणी लागल्याने गावाचा पाणीप्रश्न सुटण्यास काहीअंशी मदत होणार आहे.गावातील लोकांनी फक्त ग्रामपंचायतीवर निर्भर न राहता लोकसहभागातून केलेल्या मदतीबद्दल खुडाणेचे सरपंच प्रतिनिधी पराग माळी यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे