शिक्षण हक्क कायद्यांतर्गत १ हजार ३८ विद्यार`थींना मोफत प्रवेशप्रवेश प्रक्रीया सुरु : तालुकास्तरीय समितीकडे कागदपत्रांची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST2021-04-18T04:35:49+5:302021-04-18T04:35:49+5:30

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसह विधवा, परितक्त्या महिलांचे पाल्य, अनाथ बालक, दिव्यांग ...

Free admission process started for 1 thousand 38 students under Right to Education Act: Verification of documents to taluka level committee | शिक्षण हक्क कायद्यांतर्गत १ हजार ३८ विद्यार`थींना मोफत प्रवेशप्रवेश प्रक्रीया सुरु : तालुकास्तरीय समितीकडे कागदपत्रांची पडताळणी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत १ हजार ३८ विद्यार`थींना मोफत प्रवेशप्रवेश प्रक्रीया सुरु : तालुकास्तरीय समितीकडे कागदपत्रांची पडताळणी

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसह विधवा, परितक्त्या महिलांचे पाल्य, अनाथ बालक, दिव्यांग बालक, एचआयव्ही बाधित बालकांसाठी इंग्रजी माध्यमाच्या खासगी विना अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव आहेत. या जागा भरण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. जिल्ह्यातील १०४ शाळांमधील ११७१ जागांसाठी १ हजार ९६० अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर गेल्या आठवड्यात सोडत निघाली. ही प्रक्रिया झाल्यावर गुरूवारी १ हजार ३८ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली.

प्रतिक्षा यादी नुसार प्रवेश प्रक्रिया होईल. ज्यांची निवड झाली आहे त्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तालुकास्तरीय समितीकडून छाननी होईल. त्यानंतर दिलेल्या वेळेत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करता येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती कळवण्यात येणार आहे. जिल्ह्यात १०४ शाळांमध्ये आरटीईनुसार प्रवेश दिला जाईल. त्यात सर्वाधिक २९ शाळा साक्री तालुक्यातील आहे. तसेच धुळे तालुक्यात २५, शिंदखेडा तालुक्यात २३, शिरपूर तालुक्यात १६ तर महापालिका क्षेत्रात ११ शाळा आहे.

Web Title: Free admission process started for 1 thousand 38 students under Right to Education Act: Verification of documents to taluka level committee