शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात ४ जण झाले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:42 IST

ट्रालाच्या धडकेत आजोबा ठार, नातू जखमी चांदवड तालुक्यातील दलगाव येथील राजाराम तानाजी नरोटो (७९) व सचिन आनंद हालनोर (वय ...

ट्रालाच्या धडकेत आजोबा ठार, नातू जखमी

चांदवड तालुक्यातील दलगाव येथील राजाराम तानाजी नरोटो (७९) व सचिन आनंद हालनोर (वय २१) हे दोघे दुचाकीने (क्र.एमएच १५- ईडब्ल्यू ५३०९) धुळ्याकडून पारोळ्याकडे जात होते. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रालाने (क्र.जीजे ११-टीटी ८०९९) दुचाकीस जोरदार धडक दिली. या धडकेत राजाराम नरोटे हे जागीच ठार झाले, तर सचिन हालनोर हा जखमी झाला. हा अपघात २७ फेबुवारी रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कासविहीर शिवारात झाला. या प्रकरणी शांताराम नरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये ट्राला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दुचाकी घसरल्याने एक जण ठार एक जण जखमी

धुळ्यातील मोहाडी उपनगरातील संतोष एकनाथ चौधरी (वय ४०, रा.मोहाडी उपनगर) व किशोर बबन चौधरी (रा.पाटण, ता.चाळीसगाव) हे दुचाकीने (क्र.एमएच १९-डीआर ७२३७) जात असताना फागणे गावाच्या अलीकडे दुचाकी घसरली. त्यात संतोष चौधरी खाली पडले. त्यांना मार लागल्याने, त्यांचा मृत्यू झाला, तर किशोर चौधरी जखमी झाले. हा अपघात २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी प्रमोद चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस स्टेशनला किशोर चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.एस. काळे करीत आहेत.

रिक्षा-दुचाकी अपघातात एक जण ठार

शिंदखेडा तालुक्यातील रोहोड फाट्याजवळ रिक्षा-दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी झाली. त्या अपघाताची नोंद २७ रोजी शिंदखेडा पोलीस स्टेशनला करण्यात आली.

महेश छोटालाल शर्मा (रा.इटावा, मध्य प्रदेश, ह.मु.चिमठाणे, ता.शिंदखेडा) हे दुचाकीने फर्निचरचे लाकूड पाहण्यासाठी जात असताना, रोहोड फाट्याजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू रिक्षाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेश शर्मा हे ठार झाले. या प्रकरणी रामप्रकाश शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलीस स्टेशनला मालवाहू रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेड काॅन्स्टेबल आर.एम. माळी करीत आहेत.

दोन दुचाकींच्या धडकेत एक जण ठार

दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार व एक जण जखमी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील शिवाजीनगर फाट्याजवळ २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

भरत विष्णू पाटील (४०, रा.मोरशेवडी, ता.धुळे, ह.मु. खापर, ता.अक्कलकुवा) हे दुचाकीने (क्र.एमएच ३९-एए ९४४१) जात असताना, शिवाजीनगरच्या पुढे मागून येणाऱ्या दुचाकीने (एमएच १८-ए ९२५७) जोरदार धडक दिली. यात भरत पाटील व जीजाबाई पाटील हे खाली पडले. त्यात भरत पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रभाकर देवरे (रा. बोरीस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलीस स्टेशनला दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस करीत आहेत.