गाडीच्या डिक्कीतून चार लाख रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:35 IST2021-03-21T04:35:39+5:302021-03-21T04:35:39+5:30

दरम्यान, नागली घेऊन आलेल्या सुनील पाटील यांनी गाडीजवळ येऊन डिक्कीत ठेवलेल्या थैलीची पाहणी केली असता त्यांना ती दिसून आली ...

Four lakh rupees from the trunk of the car | गाडीच्या डिक्कीतून चार लाख रुपये लंपास

गाडीच्या डिक्कीतून चार लाख रुपये लंपास

दरम्यान, नागली घेऊन आलेल्या सुनील पाटील यांनी गाडीजवळ येऊन डिक्कीत ठेवलेल्या थैलीची पाहणी केली असता त्यांना ती दिसून आली नाही. त्या वेळी त्यांनी लागलीच आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत चोरटे ती थैली घेऊन पसार झाले होते. पैसे गेल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांची शुद्धच हरपली. जवळील लोकांनी त्यांना तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केले.

घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच मिळून आले नाही. नंतर पोलीस बँकेत गेले. त्या ठिकाणी खातेदारांवर पाळत ठेवणारे दिसतात का याची खात्री करण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज पाहिले. मात्र, त्या फूटेजमध्ये तसे काही संशयित दिसून आले नाहीत. सुनील पाटील यांनी बँकेतून रक्कम डिक्कीत ठेवल्यानंतर पाळत ठेवली असावी म्हणून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे़

Web Title: Four lakh rupees from the trunk of the car