माजी खासदार रामदास गावीत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 22:42 IST2020-04-19T22:41:50+5:302020-04-19T22:42:47+5:30

पिंपळनेर : आज पिंजारझाडी येथून निघणार अत्यंयात्रा

 Former MP Ramdas Gavit passes away | माजी खासदार रामदास गावीत यांचे निधन

dhule

पिंपळनेर :धुळे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे माजी खासदार व पिंजारझाडी एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदास रूपाला गावीत (८५) यांचे आज धुळ्यात हृदयविकाराने निधन झाले.
रामदास गावीत यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयात एम.ए.केले होते. १९६४ मध्ये ते आयकर विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून रूजू झाले. त्यांनी भोपाळ येथेही सेवा बजावली होती.
१९९९ मध्ये ते धुळे लोकसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. १९९९-२००० या कालावधीत ते कृषी समितीचे सदस्य होते. तर २००० ते २००४ या कालावधीत ते कृषी मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांची अंत्ययात्रा २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पिंजारझाडी (ता. साक्री) येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. साक्री येथील कृषी मंडळ अधिकारी सुधीर गावीत यांचे ते वडील होत.

Web Title:  Former MP Ramdas Gavit passes away

टॅग्स :Dhuleधुळे