जैताणे येथे बळसाणे जैन संस्थानतर्फे अन्नदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 12:59 PM2020-04-07T12:59:32+5:302020-04-07T12:59:52+5:30

भगवान महावीर जयंती : ३०० जणांना देण्यात आले जेवण, घरातच केली पुजाअर्चा

Food donation by Balsane Jain Institute at Jaitane | जैताणे येथे बळसाणे जैन संस्थानतर्फे अन्नदान

dhule

googlenewsNext

पिंपळनेर : भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त कोरोना महामारी मुळे गरीब लोकांना हाताला काम नसल्याने बळसाणे येथील श्री विश्वकल्यानक जय विमलनाथ तिर्थभूमी ट्रस्ट तर्फे जैताणे येथे ३००लोकांना त्यांच्या एका वेळेचे भोजन देण्यात आले.
जैताणे येथील आदिवासी वस्तीत साक्री तालुका पंचायत समिती सदस्य अशोक मुजगे याच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले.
२१ दिवसाच्या लॉकडाऊन काळात हातावर पोटअसलेल्यांना आपल्या उदरनिर्वाह चा प्रश्न भेडसावतो आहे.त्याअनुषंगाने साक्री पं.स.सदस्य अशोक मुजगे,यांनी तालुक्यातील अनेक सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून गरीब व गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून श्री विश्व कल्याण तीर्थभूमी ट्रस्ट बळसाने अध्यक्ष कमलेश गांधी संचालक महावीरभाऊ जैन, संचालक गणेश जैन, यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त जैताणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळे जवळील भिलाटीत आदिवासी बांधवांना कमलेश गांधी व महावीर जैन यांच्या सहकायार्ने मसाले भात, पुरी, चवळीची भाजी, मिष्टान्न म्हणून बुंदी चे भोजन देण्यात आले त्याप्रसंगी दंगल न्याहळदे, नानाभाऊ काटके, राकेश भलकारे,गणेश न्याहळदे, नितीन पगारे,ब्रिजलाल बोरसे, भय्या पाकळे, सजन भिल, विजय भिल,आदी बांधव उपस्थित होते.
बळसाणे स्थानकात सोमवारी सकाळी स्थानकातील पुजारी यांनी पुजा अर्चा केली.
यावेळी संस्थाचे कमलेश गांधी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी एकमेकाला हात जोडून महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात. दरवर्षी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि शोभायात्राही काढण्यात येते. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

Web Title: Food donation by Balsane Jain Institute at Jaitane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे