मजुराच्या घराला आग, संसारोपयोगी साहित्य खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:34 IST2021-03-28T04:34:16+5:302021-03-28T04:34:16+5:30

प्रकाश पोपट लोहार हे मोलमजुरी करून आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. ते शुक्रवारी रात्री घराला कुलूप लावून आपल्या ...

Fire in the house of a laborer, destroy the worldly goods | मजुराच्या घराला आग, संसारोपयोगी साहित्य खाक

मजुराच्या घराला आग, संसारोपयोगी साहित्य खाक

प्रकाश पोपट लोहार हे मोलमजुरी करून आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. ते शुक्रवारी रात्री घराला कुलूप लावून आपल्या नातेवाइकांकडे गेले होते. त्यांच्या घरात रात्री १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घराला लावलेले कुलूप तोडले आणि सुरुवातीला गॅस सिलिंडर सुरक्षित स्थळी हलविले. त्वरित वीज मंडळाला कळविल्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आली. काही क्षणात अग्निशमन बंबदेखील घटनास्थळी दाखल झाला. पण, चिंचोळ्या गल्लीत बंबाला जाता येत नव्हते. परिणामी लवकर आग विझविणे शक्य झाले नाही. आगीच्या या दुर्घटनेत लोहार यांच्या मुलाची दहावीची पुस्तके, मुलीच्या लग्नासाठी जमविलेले एक लाखांची रोकड यासह कपडे, प्लॅस्टिकची भांडी आदी सर्वसामान्य वस्तू जळून खाक झाले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली.

Web Title: Fire in the house of a laborer, destroy the worldly goods