अखेर खाजगी बसेसचा मध्यप्रदेाात जाण्याचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:35 AM2021-04-11T04:35:25+5:302021-04-11T04:35:25+5:30

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश ...

Finally, the way for private buses to go to Madhya Pradesh was cleared | अखेर खाजगी बसेसचा मध्यप्रदेाात जाण्याचा मार्ग झाला मोकळा

अखेर खाजगी बसेसचा मध्यप्रदेाात जाण्याचा मार्ग झाला मोकळा

Next

महाराष्ट्रासह इतरत्र कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने फैलाव असतांना मध्य प्रदेश शासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सेंधवा पोलिसांनी सरहद्दीवरील बिजासन घाटातच वाहनांना अडवून ठेवले़. त्यामुळे बिजासन घाटात प्रवासी व वाहन चालक ताटळकत बसून होते. कामगार पुन्हा गावांकडे परतु लागल्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी जातांना दिसत आहे़ मात्र खाजगी वाहने व प्रवासी वाहतुकीला बंदी घालण्यात आल्यामुळे वाहनांना जाता येत नाही. मध्यप्रदेश शासनाने अचानक लागू केलेल्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशी वाहतुक करणारे व खाजगी बसेसमधील प्रवाशांची गैरसोय झाली़

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जसे सरहद्दीवर जाणाऱ्या कामगारांना काही दिवसाकरीता रोखले होते, त्या प्रमाणे स्थिती निर्माण होईल म्हणून मोठ्या संख्येने कामगार गावाकडे परतत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे येथे असलेला मजुर वर्ग उत्तरप्रदेश, बिहारच्या दिशेने जात आहेत़ पण गेल्या १-२ दिवसापासून सरहद्दीवरील बिजासन घाटातच सेंधवा पोलिसांनी त्यांना रोखून ठेवले होते़ . त्यामुळे बिजासन घाटात १५ ते २० बसेस अडकून पडल्या होत्या़

९ रोजी आंदोलनाच्या प्रमुख व ज्येष्ठ समाजसेविका मेघा पाटकर यांना मध्य प्रदेश-महाराष्ट्र सरहद्दीवर प्रवाशांना ताटकळून ठेवल्याची माहिती मिळाल्यावर त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शिरपूरचे प्रांताधिकारी डॉ़.विक्रमसिंग बांदल, तहसिलदार आबा महाजन, सांगवी पोलिस ठाण्याचे एपीआय खैरनार यांच्यासह मध्य प्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर रोखण्यात आलेल्या खाजगी बसेस मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्या. मालमाहू वाहने जात असतांना फक्त लक्झरी बसेसलाच परवानगी नाकारली जात आहे़ ते कामगार मध्य प्रदेशात स्थायिक होण्यासाठी जात नाही तर उत्तर प्रदेश, बिहारकडे जात असतांना देखील त्यांना अडविले जात आहे़. या मजूरांना मध्य प्रदेश शासनाने रोखवायचे होते तर यापूर्वी महाराष्ट्र शासनाला सूचित करणे आवश्यक होते, मात्र तसे देखील कळविले नसल्याचे सांगण्यात आले़.महाराष्ट्र-मध्य प्रदेश शासनाने सरहद्दीवर रोखणाऱ्या मजुरांची निवास व जेवणाची व्यवस्था तरी करावी अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली़.

Web Title: Finally, the way for private buses to go to Madhya Pradesh was cleared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.