शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर भुयारी गटार योजना दृष्टिपथात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2017 00:29 IST

महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना यापूर्वी केंद्र शासनाकडून नाकारण्यात आली होती़ मात्र नगरपरिषद संचालनालयाने महापालिकेस ही योजना दुसºया अभियानातून राबविण्याबाबत सूचित केले होते़

धुळे : महापालिका क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजना यापूर्वी केंद्र शासनाकडून नाकारण्यात आली होती़ मात्र नगरपरिषद संचालनालयाने महापालिकेस ही योजना दुसºया अभियानातून राबविण्याबाबत सूचित केले होते़ त्यानुसार मनपाने पाठविलेल्या २०१ कोटींच्या प्रस्तावाचा समावेश अमृत अभियानात करण्यात येणार असून तशी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सूत्रांनी दिली़नगरपरिषद संचालनालयाने मनपाला दिलेल्या प्रस्तावानुसार अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम फॉर स्मॉल अ‍ॅण्ड मेडियम टाऊन (यूआयडीएसएसएमटी) योजनेंतर्गत महापालिकेने १९२.०४ कोटींच्या निधीची भुयारी गटार योजना मंजुरीसाठी प्रस्ताव २०१३ मध्ये सादर केला होता़ तथापि, मार्च २०१४ मध्ये नगरविकास विभागाने या योजनेत नव्याने कोणताही प्रकल्प सादर करू नये, अशी सूचना दिली होती़ त्यामुळे महापालिकेची भुयारी गटार योजना केंद्राकडे  सादर करता येणार नाही. ही योजना इतर योजना अथवा अभियानातून राबवावी, असे स्पष्ट करण्यात आले होते़नवीन प्रस्ताव केला सादरदरम्यान, सदरच्या पत्रानंतर मनपाने सुधारित २०१ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी घेऊन शासनाला सादर केला होता़ या प्रस्तावासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांचा पाठपुरावा सुरू होता़ त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून शहरातील व पांझरा नदी परिसरातील गावांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला होता़ त्यावर मुख्यमंत्र्यांनी अमृत योजनेत या प्रकल्पाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते़ त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ९० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली़  गेल्या महिनाभरापासून शासनाने अमृत योजनेशी संबंधित माहिती महापालिकेकडून मागविली होती़ त्यानुसार भुयारी गटारी योजनेच्या प्रस्तावाची माहितीदेखील शासनाला सादर करण्यात आली होती़