शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलवरील वीजपुरवठा सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:38 IST

गेल्या दोन महिन्यांपासून कुसुंबा ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील इलेक्ट्रिक ...

गेल्या दोन महिन्यांपासून कुसुंबा ग्रामपंचायतीने वीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गावातील इलेक्ट्रिक पोलवरील दिव्यांचा वीज पुरवठा बंद केला होता. त्यामुळे गावात अंधार होता. माजी जि. प. सदस्य संग्राम पाटील व पंचायत समिती सदस्य रितेश परदेशी यांनी ग्रामपंचायतीला वीज बिल भरण्यास सांगितले होते. मात्र, ग्रामपंचायतीने असमर्थता व्यक्त केली होती. अखेर संग्राम पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी. यांना पत्र देऊन मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यातूनही निर्णय न झाल्याने, संग्राम पाटील व रितेश परदेशी हे गुरुवारी जि.प.तील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले होते. उपोषणाची दखल घेत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कामराज पाटील यांनी मध्यस्थी करून जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क करून यावर मार्ग काढण्यास सांगितले. प्रकाश खोपकर यांनी महावितरणचे मुख्य अभियंता भामरे यांच्याशी चर्चा केली. भामरे यांनी ग्रामपंचायत कुसुंबा यांच्या प्रशासनाशी चर्चा करून बिल भरून गावातील लाईट आजच सुरू करण्यात येईल, असे सांगितले. गटविकास अधिकारी गौतम सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक शेळके, विस्तार अधिकारी कपिल वाघ यांनी उपोषणकर्त्यांना मागणी मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.