शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

तलाठीऐवजी शेतकरीच करणार आता पीक नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST

थाळनेर - सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला सजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यातही कधी ...

थाळनेर - सात-बारावर पिकांची नोंदणी तलाठ्यांकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी शेतकऱ्याला सजा कार्यालयाच्या खेटा माराव्या लागायच्या. त्यातही कधी कापूसऐवजी सोयाबीन, कधी धानाऐवजी गहू अशा चुकीच्या पिकांची नोंदणी करीत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून व्हायची. मात्र आता महसूल विभागाने डिजिटल तंत्राद्वारे नवे ई-पीक पाहणी ॲप तयार केले आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्याला स्वतःच्या पिकांची नोंदणी स्वतःच करता येणार आहे. विशेष म्हणजे पिकांचा फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे ॲप शेतकऱ्यांना खुले करण्यात आले आहे.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे महसूल विभाग तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना नव्या ई-पीक पाहणी ॲपबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना ॲपची माहिती देण्यात आली. यावेळी तलाठी सुनील जे. मराठे, शेतकरी गजेंद्र चौधरी, उज्ज्वल निकम, राजेंद्र चौधरी, महेश सोनवणे, महेश राजपूत, खुशाल वाडिले, सुनील पाटील, कोतवाल बाबाजी शिरसाठ आदी उपस्थित होते.

शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनींची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या नोंदणीच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते. पूर्वी ही नोंदणी तलाठ्यांकडून केली जायची. परंतु ग्रामीण भागात एकाच तलाठ्याकडे दोन ते तीन सजांचा कार्यभार असतो. त्यामुळे तलाठी कधी या साजाला, तर कधी त्या साजाला जायचे. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. बहुतेकदा पिकांची नोंद करताना चुकासुद्धा व्हायच्या. परंतु आता महसूल विभागाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने ई-पीक पाहणी हे मोबाइल ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच शेतातील बांधावरून पीक नोंदणी करता येणार आहे. तसेच पिकांचे फोटोसुद्धा अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.

दरम्यान, महसूल विभागातर्फे गावागावात मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायकांकडून शेतकऱ्यांना हे ॲप कसे हाताळावे याबाबत माहिती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडूनही ॲपची माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिसाद मिळत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

नुकसान भरपाई मिळणे सोयीचे

या ॲपद्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतःच करणार आहे. त्यामुळे पिकांची अचूक नोंदणी होणार आहे. परिणामी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान भरपाई आणि पीकविमा मिळणे सोपे होणार आहे. ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे आहे. त्यावर आपली माहिती भरून नोंदणी केल्यावर एक सांकेतांक प्राप्त होईल. त्यानंतर आपल्या शेतावर जाऊन पिकांच्या फोटोसह क्षेत्र, पिकाचे नाव, सिंचन पद्धती आदी माहिती भरून साठवायचे आहे. एका नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून २० खातेदारांची पीक पाहणी नोंदवता येईल. त्यामुळे स्मार्टफोन नसल्यास चिंतेचे कारण नाही. कुठलीही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी आपल्या गावातील स्थानिक तलाठी, कृषी सहायक, कोतवाल यांच्याशी संपर्क साधायचा आहे. खरीप हंगामाची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असली तरी ३१ ऑगस्टपावेतोच आपली पीक पाहणी नोंदवावी. या माहितीचा उपयोग पीकविमा, नुकसान झाल्यास अनुदान वाटप अशा विविध शासकीय योजनांसाठी होणार आहे.

- सुनील जे. मराठे, तलाठी थाळनेर