धुळे जिल्ह्यात शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू?

By Admin | Updated: April 27, 2017 15:18 IST2017-04-27T15:18:18+5:302017-04-27T15:18:18+5:30

धुळे येथील दवाखान्यात नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Farmer in Dhule district: Does he die of fatality? | धुळे जिल्ह्यात शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू?

धुळे जिल्ह्यात शेतक:याचा उष्माघाताने मृत्यू?

ऑनलाइन लोकमत

कापडणे, जि. धुळे, दि. 27 - धुळे तालुक्यातील धनूर येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील (54) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी  केला. मात्र या वृत्ताला वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला नाही. 
धनूर येथील शेतकरी अशोक पाटील यांना अस्वस्थ वाटून त्यांना उलटय़ा व चक्कर येत होते.   त्याना जास्त त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी  धुळे येथील दवाखान्यात नेत  असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. 

Web Title: Farmer in Dhule district: Does he die of fatality?