शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:11+5:302021-04-07T04:37:11+5:30

धुळे : जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित ...

Extension for scholarship application; | शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ;

शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदतवाढ;

धुळे : जिल्ह्यातील शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांना सन २०२०- २१ या वर्षात भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी या संगणक प्रणालीवर १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी दिली.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या अर्जांची परिपूर्ण छाननी करून सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास ऑनलाइन विहित मुदतीत सादर करावेत. महाविद्यालयांकडून विहित कालावधीत अर्जाबाबत कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले, तर अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत महाविद्यालय जबाबदार राहील.

धुळे जिल्ह्यातील शिष्यवृत्तीस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरावेत. सदर अर्जावर महाविद्यालयांनी विहित कालावधीत तात्काळ कार्यवाही करावी, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Extension for scholarship application;