प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करा - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 13:04 IST2021-02-04T13:04:26+5:302021-02-04T13:04:49+5:30

धुळ्यात कोरोना योध्दांचा सन्मान, अनेकांची होती उपस्थिती

Everyone do your duty - Governor | प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करा - राज्यपाल

प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करा - राज्यपाल

धुळे : कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही़ सर्वांनी दक्ष राहण्याची गरज आहे़ त्यामुळे समर्थपणे प्रत्येकाने आपल्या कर्तव्याचे पालन करावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले़
धुळ्यात महापालिकेत राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला़ त्यावेळी ते बोलत होते़ व्यासपिठावर खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख व्यासपिठावर उपस्थित होते़ याशिवाय पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, नागरीकांचीही देखील उपस्थिती होती़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रास्ताविकातून धुळ्याची माहिती दिली़ आयुक्त अजीज शेख यांनी आभार मानले़

Web Title: Everyone do your duty - Governor

टॅग्स :Dhuleधुळे