शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
4
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
5
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
6
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
7
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
8
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
9
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
10
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
11
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
12
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
13
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
15
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
16
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
17
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
18
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
19
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
20
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलच्या साखर व्यापाऱ्याला धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:35 IST

धुळे न्यायालय : ७ लाख १५ हजाराचा ठोठावला दंड

धुळे : एरंडोल येथील साखरचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने यांना धनादेश अनादर प्रकरणी १८ महिन्यांची शिक्षा आणि ७ लाख १५ हजाराचा दंड अशी शिक्षा धुळे येथील न्यायालयाने ठोठावली़ त्यापैकी ७ लाख रुपये या प्रकरणाचे फिर्यादी कुमार दंडवाणी यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला़धुळे येथील जयसाई ट्रेडर्सचे संचालक कुमार जयकिशन दंडवाणी हे साखरेचे होलसेल व्यापारी आहेत़ तर एरंडोल येथील मानुधने ट्रेडींग कंपनीचे संचालक मनोज गोकुळदास मानुधने हे देखील साखरेचे होलसेल व्यापारी म्हणून काम करीत असतात़ दोन्ही साखरेचे होलसेल व्यापारी असल्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्यांचे व्यावसायिक संबंध असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवून साखरेच्या व्यवसायाकरीता साखर घेण्याकरीता एचएफडीसी बँकेच्या धनादेशद्वारे ८ लाख ८४ हजार रुपये दंडवाणी यांनी मानुधने या व्यापाºयाला दिले़ परंतु मानुधने यांनी जाणीवपुर्वक या रकमेचा माल दिलेला नाही़ पाठपुरावा करुनही साखर मिळत नसल्याने धनादेशाद्वारे पाठविलेली रक्कम परत करावी अशी मागणी दंडवाणी यांनी केली़ मात्र धनादेशाची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली़ यासंदर्भात विचारणा केली असता सदर रकमेच्या परतफेडीकरीता तीन धनादेश देण्यात आले होते़ हे धनादेश नक्की वटतील अशी हमी आणि विश्वास देण्यात आला़ बँकेत हे धनादेश वटविण्यासाठी पाठविले असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते वटले नाही़ यासंदर्भात रजिस्टर नोटीस पाठविण्यात आली़ नोटीस मिळाल्यानंतरही रक्कम देण्यात आली नाही़ परिणामी कुमार दंडवाणी यांनी धुळ्यातील न्यायालयात वेगवेगळ्या तीन फिर्याद दाखल केली़ दोघेही बाजुंचे साक्षीपुरावे आणि युक्तीवाद झाल्यानंतर एरंडोल येथील साखरेचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने हे दोषी आढळल्याने न्यायाधीश एम़ एम़ निकम यांनी १८ महिन्यांची शिक्षा आणि ७ लाख १५ हजाराचा दंड ठोठावला़ तसेच नुकसान भरपाई म्हणून ७ लाख रुपये द्यावेत़ दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली़ या निकालाकडे लक्ष लागले होते़याप्रकरणाचे फिर्यादी कुमार जयकिशन दंडवाणी यांच्यातर्फे अ‍ॅड़ नितीन लक्ष्मण रायते यांनी काम पाहीले़ त्यांना अ‍ॅड़योगेश सावळे, अ‍ॅड़ ललित देठे आणि अ‍ॅड़ अतुल अहिरे यांनी मदत केली़

टॅग्स :Dhuleधुळे