पटेल महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:27+5:302021-02-24T04:37:27+5:30

आॅनलाईन पद्धतीने युट्युबद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण व सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य निश्चल नायर, उपप्राचार्या अनिता थॉमस यांनी ...

Enthusiasm at Patel College | पटेल महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

पटेल महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात

Next

आॅनलाईन पद्धतीने युट्युबद्वारे कार्यक्रमाचे प्रसारण व सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य निश्चल नायर, उपप्राचार्या अनिता थॉमस यांनी दीपप्रज्वलन करून केली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण जगात निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात आपल्या भारत देशाने कोणकोणत्या क्षेत्रात प्रगती केली व सामान्य जनतेने त्या काळात सकारात्मक दृष्टीने कोणकोणत्या नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या, त्याचे सुंदर दर्शन नाटिकेच्या माध्यमातून इयत्ता ९ च्या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले. नाटिका व त्यावर आधारित नृत्य यांची सांगड घालत चित्रपट स्वरुपात संपूर्ण कार्यक्रमाची गुंफण करण्यात आली.

इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी स्कूल मिसिंग... व ओ बेटा जी... या गीतावर नृत्य सदर केले तर इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ओरी चीरय्या.... व स्वागत नृत्य सदर केले. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स डान्स सादर केला. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन डान्स सादर केला. म्युझिकल मॅशप, थीम सॉंग, रॅप सॉंग, ए.आर.पी.रॉक सॉंग इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केले. इयत्ता १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी फिनाले व ग्रँड फिनाले या नृत्यातून आपण वर्तमान काळात आलेल्या जागतिक संकटावर मात करत भविष्याची नवी दालने उघडत पुढे आनंदाने मार्गक्रमण करून भविष्यातील स्वप्ने साकार करणार असा संदेश दिला.

हेल्थ, इकोनॉमी, अम्बिशन, टेक्नोलॉजी हिट' या संकल्पनेवर आधारित थीम गीत, जीवन को जीवन से आज सवारे हम, विश्व को आत्मनिर्भर आज बनाये हम असे लेखन लक्ष्मण पाटील यांनी लिहिले असून संगीता शास्त्री यांनी संगीत बद्ध केले. त्यांना स्वपा तमबोली यांनी सहकार्य केले. या थीम गीताच्या आधारे संपूर्ण कार्यक्रमाची रचनात्मक सुरुवात करण्यात आली. तसेच या संकल्पनेवर आधारित संपूर्ण कार्यक्रमाची नाट्य संहिता लेखनाची जबाबदारी निलेश चोपडे, वाहिद शेख, महेश पिसू, राकेश साळुंखे, मंगेश ठाकूर, मधूबाला चंडेल, जयश्री कोष्टी, भारती सोनवणे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. कार्यक्रमातील नृत्य कला सजावट प्रशांत बागुल, सागर वाघ, जितेंद्र लोहार, विनोद अमृदकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे चित्रिकरण रजनीकांत ठाकूर, निखिल भावसार, हेमंत देवरे आदीनीं केले. सजावट व वेशभूषा प्रशांत लोहार, दिपक पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संगणकीकरण केतकी शर्मा, पंकज बागुल, शिवानी बसीण या चमूने केले़ सूत्रसंचालन प्रियांश कोष्टी, तस्नीम अन्सारी, आचल राणा यांनी केले.

Web Title: Enthusiasm at Patel College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.