शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.तील मनोरंजन सेवा फक्त नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : एस.टी.चा प्रवास सुखाचा व मनोरंजनाचा करण्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलधारक प्रवाशांना एस.टी. महामंडळातर्फे  मोफत वायफाय ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एस.टी.चा प्रवास सुखाचा व मनोरंजनाचा करण्याच्या दृष्टीने अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलधारक प्रवाशांना एस.टी. महामंडळातर्फे  मोफत वायफाय (हॉटस्पॉट) सेवा पुरविण्यात येत आहे.  त्यामुळे प्रवाशांना आपल्या मोबाईलवर चित्रपट, मालिका व गाण्यांचा आनंद घेता येत होता. मात्र अडीच वर्षाच्या कालावधीतच ही सेवा कोलमडलेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनोरंजनावर पाणी फिरले आहे. आज काही बसेसमध्ये वायफायचे यंत्र असूनही त्याचा उपयोग होत नाही. तर नूतनीकरण करण्यात आलेल्या बसगाड्यांमध्ये हे यंत्रच लावण्यात आलेले नाही. खाजगी बसगाड्यांच्या स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाची बस मागे पडू लागल्याने प्रवाशांनीही महामंडळाच्या बसकडे पाठ फिरविली. त्यामुळे प्रवाशांना बसकडे आकृष्ट करण्यासाठी प्रवासादरम्यान प्रवाशांची करमणूक व्हावी या उद्देशाने एस.टी.मध्ये वायफाय सेवा सुरू करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला. जानेवारी २०१७ पासून महामंडळाने आपल्या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केली होती.  ही सुविधा मुंबईच्या एका कंपनीमार्फत पुरविण्यात  येत होती. यासाठी बसमध्ये वायफायचा एक बॉक्स बसमध्ये लावण्यात आला होता. त्यामुळे मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध होऊन, मोबाईलवर चित्रपट, मालिका, हिंदी गाणी आदींच्या माध्यमातून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात येत होते. धुळे विभागात मार्च २०१७ पासून वाय-फाय यंत्र बसविण्यास सुरवात झाली होती. धुळे जिल्ह्यातील धुळे,  साक्री, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा  या  आगाराच्या एकूण ४७४ बसगाड्या असून, यातील बहुतांश बसेसमध्ये हे यंत्र बसविण्यात आले होते. सुरवातीला या मोफत वायफाय सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र कालांतराने त्याचे आकर्षण कमी झाले.  आता प्रत्येकाकडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल असून, अनेकजण स्वत:च्याच मोबाईलद्वारे चित्रपट, मालिका, गाणी एकेत असल्याने, या यंत्राचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून आले. आता तर ही सेवाच कोलमडली असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. नवीन बसेसमध्ये यंत्रच नाहीदरम्यान महामंडळातर्फे जुन्या गाड्यांचेच नुतनीकरण करून त्यांना ‘लक्झरी’सारखा लूक देण्यात आलेला आहे. या नवीन चेसीसच्या गाड्यांमध्ये हे यंत्रच लावण्यात आलेले नाही. त्याचबरोबर ‘शिवशाही’तही हे यंत्र नाही.

टॅग्स :Dhuleधुळे