शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महानगरात प्रभावी अंंमलबजावणी झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST

धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, सहाजिकच येथील बाजारपेठ मोठी आहे. येथे शहरासह ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी, शासकीय कामांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण ...

धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने, सहाजिकच येथील बाजारपेठ मोठी आहे. येथे शहरासह ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी, शासकीय कामांसाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र लॅाकडाऊन जाहीर होताच, महापालिका व पोलीस प्रशासनाने शहराचा ताबा घेतला. ज्या रस्त्यांवर, बाजारपेठेत वर्दळ होती, तेथे फक्त पोलीसच नजरेस पडत होते.

शहरात पाचकंदील, जुना आग्रारोडवर शुकशुकाट होता. पारोळा चौफुली, संतोषी माता चौक, बसस्थानक, जुना आग्रा रोड या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला होता. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना, मास्क न लावणाऱ्यांचा ‘प्रसाद’ देण्यात येऊ लागला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. लॅाकडाऊनमुळे बाहेर फिरणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी झाली.

पुलांवरील वाहतूक केली बंद

शहरातील पांझरा नदीवरील गणपती मंदिर ते मोराणकर बंगलाकडे जाणारा पूल, कालिका माता मंदिर ते जयहिंद स्वीमिंगकडे जाणारा पूल, महात्मा गांधी पुतळा ते पंचवटीकडे जाणारा मोठा पूल असे तीन पूल रहदारीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले़ तर आपत्कालिन व अत्यावश्यक सेवेसाठी पांझरा नदीवरील दातासरकार ते सावरकर पुतळा दरम्यान असलेला लहान पूल सुरू ठेवण्यात आला होता. आवश्यकता असलेल्यांनाच या पुलावरुन वावरता येत होते. मात्र या ठिकाणीही पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला होता.

अनेकांवर केली दंडात्मक कारवाई

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून लॅाकडाऊन सुरू झालेले असले तरी मनपातर्फे विनामास्क, रस्त्यावर थुंकणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे अशांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. यात सोशल डिस्टन्सिंग न ठेवणाऱ्यांकडून २ लाख ७८ हजार ५०० रूपये, रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून ३० हजार ९००, मास्क न लावणाऱ्यांकडून १० लाख ७४ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे.

पोलिसांनीही केली कारवाई

मास्क न लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनीही कारवाईचे शस्त्र उगारले होते. विनाकारण फिरणाऱ्या ६९९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तर विनामास्क वापरणाऱ्या २० हजार १७२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २६ लाख १६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.