घाणेगावचा तरुण अपघातात ठार

By Admin | Updated: March 17, 2017 00:14 IST2017-03-17T00:14:58+5:302017-03-17T00:14:58+5:30

आर्वी शिवारातील घटना : पोलिसात नोंद

Dying in a dirty accident | घाणेगावचा तरुण अपघातात ठार

घाणेगावचा तरुण अपघातात ठार

धुळे : दुचाकी अपघातात घाणेगाव (ता़मालेगाव) येथील तरुण ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात घडली़ अपघाताची तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आह़े
रवींद्र नागो बैसाणे (वय 32, रा़ घाणेगाव, ता़मालेगाव जि़ नाशिक) असे मयत तरुणाचे नाव आह़े तो 15 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीने धुळे येथून घाणेगावकडे जात असताना आर्वी गावाजवळ मागून येणा:या अज्ञात दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली़ त्यात रवींद्र बैसाणे हा गंभीर जखमी झाला़  त्याला 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल़े तेथे डॉ़ अरुणकुमार नागे यांनी तपासणी करून मृत घोषित केल़े
याबाबत पो़कॉ. बी़डी़ ठाकरे यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आह़े तपास पो़ह़ेकॉ. आऱ ए़ जाधव करीत आहेत़

Web Title: Dying in a dirty accident