शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकाधीश यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 22:31 IST

देवाचे विखरण : दर्शनासाठी पहाटेपासूनच लागल्या रांगा; दुकानांमध्ये खरेदीसाठी झाली गर्दी

dमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील देवांचे विखरण येथे दिडशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यावर्षी पावसाचे संकट उभे राहिले तरी सकाळपासूनच यात्रेत गर्दी दिसून आली. तर द्वारकाधीस मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांची चांगलीच विक्री झाल्याने त्यांच्यातही समाधानाचे वातावरण होते.दोंडाईचा-धुळे रस्त्यालगत विखरण येथे द्वारकाधीश मंदिर असून तेथे भगवान विष्णूंची स्वयंभू मूर्ती खोदकामात सापडेली असल्याचे गावकरी सांगतात. त्या मूर्तीची तत्कालीन परिस्थितीत विधीवत स्थापना करुन तेव्हा पासून परंपरागत कार्तिकी एकादशीच्या दिवशी यात्रा भरते. धुळे जिल्हासह खान्देशात ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेपासुन ख?्या अथार्ने खान्देशात यात्राना सुरुवात होत असल्याचे गावकरी सांगतात. या यात्रेत सकाळी रात्री मोठी गर्दी यात्रेकरुंनी केली.या यात्रेत दुरदुरवरुन आलेले भाविक नवस फेडतांना दिसून आले. तर परिसरातील नागरिक संसार उपयोगी साहित्य खरेदी करतांना गर्दी केली होती. मात्र यावर्षी परतीच्या व चक्रीवादळाचे पावसाचे सावट तसेच ९ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने विक्रेते व व्यावसायिकांमध्ये याची धास्ती आहे. यामुळे तारांबळ उडतांना दिसून आली.खेळणी विकणारे विक्रेते, दरवर्षी यात्रेत येणारे हॉटेल व्यवसायिक दाखल झालेले आहेत. महिलांसाठी प्रसाधन सौंदर्याची दुकाने लागली आहेत. सुमारे आठदिवस या यात्रेची येथे वर्दळ सुरू असते. यात दोन दिवस लांब दुरवरुन मनोरंजनासाठी तमाशा फड दाखल झाले आहेत. तसेच करमणुकीसाठी पालख्या विविध खेळांच्या कसरतीचे प्रकार देखील या यात्रेत पाहावयास मिळत असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत होते.यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थित ध्वज पुजन देखील झाले. यानंतर भजन गायनाने उत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्यात प्रतिपंढरपुर समजले जाणारे द्वारकाधीश संस्थान हे परिसरातील एक मुख्य वारकरी सांप्रदायिक पीठ असृन श्री सद्गुगुरु श्री विठ्ठल स्वामी महाराज यांनी त्याची स्थापना केल्याचे सांगण्यात येते. कार्तिकी एकादशी निमित्ताने नामसंकिर्तन सप्ताह श्रीमद भागवत पारायण किर्तन प्रवचने पालखी सोहळा आदींचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Dhuleधुळे