शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात प्रौढाला ४३ हजारात गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:39 IST

फसवणूक : खोटी बतावणी चांगलीच भोवली

धुळे : क्रेडीट कार्डचे व्हेरीफिकेशन करायच्या नावाने माहिती घेवून एका पौढाला ४३ हजारांत गंडविले असल्याची घटना धुळ्यात घडली़ याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़देवपुरातील स्रेहप्रभा हौसिंग सोसायटीत राहणारे प्रदीप काशिराम पाटील (५८) यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, बँकेतून बोलत असून क्रेडीट कार्डचे व्हेरीफिकेशन करायचे आहे़ त्यामुळे बँक खात्याची सविस्तर माहिती द्यावी, अशी खोटी बतावणी करण्यात आली़ बँकेतून बोलत असल्याने त्यावर विश्वास ठेवत प्रदीप पाटील यांनी स्वत:च्या बँकेतील खात्याबाबतची आवश्यक ती माहिती देवून टाकली़ यानंतर अल्पवधीतच आॅनलाईन ट्रान्झेक्शन करुन ४३ हजार ९९३ रुपये परस्पर काढून घेण्यात आले़ पैसे बँक खात्यातून परस्पर लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेशी संपर्क साधण्यात आला़ फसवणूक झाल्याची घटना २५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली आहे़घटना लक्षात आल्यानंतर तातडीने प्रदीप पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठले़ आपली कोणीतरी फसगत केल्याचे सांगत आपबिती कथन केली़ त्यानंतर १९ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल करण्यात आली़ त्यानुसार, फसगत करणाऱ्याविरुध्द भादंवि कलम ४२० सह आयटी अ‍ॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ शहर पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी