ट्रक भिंतीवर आदळल्याने चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 08:28 PM2020-10-06T20:28:17+5:302020-10-06T20:28:31+5:30

शिरपूर : दहिवद फाट्याजवळ झाला अपघात, क्लिनर किरकोळ जखमी, रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद नाही

The driver was killed when the truck hit a wall | ट्रक भिंतीवर आदळल्याने चालक ठार

dhule

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : चोपड्याकडून शिरपूरकडे येणारा भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दहिवद फाट्याजवळ दुचाकी व हातगाडीला धडक दिली. त्यानंतर हा ट्रक पुलाच्या भिंतीवर आदळल्याने, चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर क्लिनर किरकोळ जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास दहिवद फाट्यावर झाला.
चोपड्याकडून गठाण घेवून येणारा ट्रक @(क्रमांक जीजे १८-यू-६६८३) भरधाव वेगाने येत असतांना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले़ दहिवद फाट्यावर चोपडा रोडवर ७० वर्षीय वृध्द महिला केळीचे वेफर्स विक्रीचा व्यवसाय करीत असल्यामुळे तिचा मुलगा सुदाम शंकर गवळी रा़दहिवद हे जेवणाचा डबा घेवून आले होते़ त्यांनी दुचाकी रस्त्याच्याकडेला उभी करून ते आईशी बोलत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणारा ट्रक येत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी रस्त्याच्या बाजूला उडी घेतल्यामुळे ते बालबाल वाचलेत़ त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे नव्या गाडीचा चक्काचूर झाला़ बाजूला उभ्या असलेल्या ठेला गाडीलाही ठोस देवून नुकसान केले़ त्यानंतर हा ट्रक पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात चालक नागराज केशव पाटील (६४, रा. अहमदाबाद) हा मृत झाला. तर क्लिनर रमण परमार हा किरकोळ जखमी झाला.
या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर साईडचा भाग दाबला गेल्याने लोकांनी पत्रा कापून त्यास बाहेर काढले़ रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद झालेली नव्हती.

Web Title: The driver was killed when the truck hit a wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.