शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, चारा टंचाईने ग्रामस्थ बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:28 IST

चिमठाणे परिसर : गाव पाणीपुरवठा विहिरी आटल्या, चारा छावण्या उभारण्याची मागणी

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरात जल पातळी खालावल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात गुरांसाठी चारा व पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी व पशुपालक हवालदिल झाले आहेत. पाणीप्रश्न मार्गी लावून चारा छावण्या निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.चिमठाणे हे सुमारे ८ ते १० हजार लोकसंख्येचे गाव आहे. यंदा पुरेशा पावसाअभावी पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण आहे. त्यात तीव्र उन्हामुळे दिवसेंदिवस जल पातळी अजूनच खालावत असल्याने चिंता वाढली आहे.चिमठाणे परिसरात ८ दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी जवळपास कोरड्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चिमठाणे ग्रामपंचायतीने ७ ते ८ ठिकाणी बोअरवेल केले. परंतू ३ ते ४ ठिकाणीच पाणी लागले आहे. परंतू पाण्याची पातळी खोल गेली आहे.यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरांसाठी पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रणरणत्या उन्हात शेतकरी गुरांना चरण्यासाठी रानावनात घेऊन जातात. परंतू रानात चाराच मिळत नसल्याने हताशपणे माघारी परतावे लागत आहे. सद्यस्थितीत चारा महाग झाला आहे. तरी सहजासहजी चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. गुरांची भूक भागविण्यासाठी पशुपालक मिळेल तेथून चारा आणताना दिसून येत आहे. गुरांसाठी पिण्याचे पाणी व चाºयाची टंचाई भासत असल्याने पशुपालक स्थलांतराच्या तयारीत दिसून येत आहेत.बुराई बारमाही करण्यासाठी नदीवर धरणे बांधण्यात आली. परंतू पाऊसच कमी प्रमाणात झाल्याने धरण देखील कोरडे आहेत. पाणी व चाºयाचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने नदी काठावरील गावकऱ्यांना आगामी काळ कसा काढावा, असा प्रश्न पडला आहे.एकीकडे पाणी व चाराटंचाई भेडसावत आहे. दुसरीकडे युवकांना रोजगार मिळेनासा झाला आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीशी सामना कसा करावा या विवंचनेत नागरिक दिसून येत आहे.बुराई नदीच्या पात्रातून बेसुमार वाळूचा उपसा होत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाळू चोरट्यांकडून बुराई पात्रातून राजरोसपणे अवैद्य वाळू उपसा सुरु असून प्रशासनाने त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. शासनाने पाणीप्रश्न मार्गी लावावा, चारा छावण्या उभारण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे