एक कोटीचा निधी द्या, पण ॲाक्सिजन, रेमडेसिविर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:19+5:302021-04-20T04:37:19+5:30

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे पत्र पाठविले आहे याबाबत आ.रावल यांनी लिहिलेल्या पत्राचा आशय असा की, फेब्रुवारीपासून ...

Donate one crore, but give oxygen, remedicivir | एक कोटीचा निधी द्या, पण ॲाक्सिजन, रेमडेसिविर द्या

एक कोटीचा निधी द्या, पण ॲाक्सिजन, रेमडेसिविर द्या

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना ईमेल द्वारे पत्र पाठविले आहे

याबाबत आ.रावल यांनी लिहिलेल्या पत्राचा आशय असा की, फेब्रुवारीपासून शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त बेड करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जेव्हा धुळे जिल्ह्यात अत्यंत कमी रुग्ण होते, परंतु निधीची अडचण होती की, काय माहिती नाही, पण अद्यापही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन युक्त बेडची सोय झाली नाही. दोंडाईचा येथील कोविड सेंटरसाठी दररोज औरंगाबादच्या पटेल बंधुशी असलेले संबंध वापरून ऑक्सिजन मिळवीत आहोत. त्या ठिकाणीही शासनाने अडचणी उभ्या केल्या आहेत. जर तिथून ही ऑक्सिजन मिळाला नाही, तर धुळे जिल्ह्यातील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल, याची चिंता आहे. राज्य शासनाने आता आमदार निधीतून १ कोटी खर्च करायला परवानगी दिली आहे, त्यामुळे माझा पूर्ण १ कोटी निधी ऑक्सिजन आणि रेमडेसिविर साठी खर्च करा, पण रुग्णांना या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, अशी मागणी माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे केली आहे.

Web Title: Donate one crore, but give oxygen, remedicivir