शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दररोज लागतोय २० टन ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST

धुळे - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवडाभराच्या तुलनेत ...

धुळे - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यासोबतच दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठवडाभराच्या तुलनेत सध्या दुप्पट ऑक्सिजन लागत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात १० टन इतका ऑक्सिजन लागत आहे, तसेच जिल्हा रुग्णालय व तालुकास्तरावरील रुग्णालयांना एकत्रित १० टन इतका ऑक्सिजन लागत आहे. यापूर्वी पाच ते सहा टन ऑक्सिजन लागत होता. आता मात्र त्यात मोठी वाढ झाली आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँकची १३ टन इतकी क्षमता आहे. त्यापैकी ३ टन ऑक्सिजन शिल्लक राहू द्यावा लागतो. उर्वरित १० टन ऑक्सिजन एका दिवसात संपत असून, दररोज ऑक्सिजन टँकचे पुनर्भरण करण्यात येत आहे.

हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २६६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १४६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, तर ५५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

तालुकास्तरावर मागणी वाढली - धुळे शहरात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शहरातील सर्व रुग्णालयांतील बेड फुल झाले असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी तालुकास्तरावरच ऑक्सिजन बेड तयार करण्यात आले आहेत. रुग्णवाढीच्या पहिल्या लाटेत तालुकास्तरावरील कोविड केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. केवळ सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात होते. ऑक्सिजनची गरज असलेल्या व गंभीर रुग्णांना हिरे वैद्यकीय महाविद्यालय किंवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. आता मात्र तालुकास्तरावरील कोविड केंद्रात ऑक्सिजनयुक्त बेड तयार करण्यात आले आहेत. मात्र, वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे तेथील बेड अपूर्ण पडू लागले आहेत, तसेच ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

शिरपूर तालुक्यात लागतात ५० सिलिंडर -

शिरपूर तालुक्यातील कोविड केअर केंद्रात दररोज ४० ते ५० मोठे ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. यापूर्वी केवळ १० ते १५ ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. मात्र आता रुग्णांची संख्या वाढल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. एकूण २६० बेडपैकी ७५ बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहेत.

शिंदखेड्यात १५० ऑक्सिजनयुक्त बेड -

शिंदखेडा तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये १५० ऑक्सिजनयुक्त बेड आहेत. त्यात, दोंडाईचा व शिंदखेड्याचा समावेश आहे, तसेच ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. सध्या ३५ मोठे ऑक्सिजन सिलिंडर दररोज लागत आहेत. यापूर्वी केवळ १० सिलिंडर लागत होते.

साक्रीत ५० ऑक्सिजन बेड -

साक्री तालुक्यातील कोविड केअर केंद्रात ५० ऑक्सिजनयुक्त बेड करण्यात आले आहेत, तसेच एकूण बेडची क्षमता ३३५ बेडपर्यंत वाढविण्यात आली आहे. सध्या दररोज १५ मोठे ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. उपलब्ध बेड अपूर्ण पडू लागले आहेत. त्यामुळे पिंपळनेर येथे आणखी १०० बेडची तयारी प्रशासनाने केली आहे. येत्या दोन दिवसांत १०० बेड्चे कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया -

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँकची क्षमता १३ टन इतकी आहे. त्यापैकी ३ टन ऑक्सिजन शिल्लक राहू द्यावा लागतो. १० टन ऑक्सिजन दररोज लागत आहे. दररोज ऑक्सिजन टँकचे पुनर्भरण केले जाते.

- डॉ.दीपक शेजवळ, कोरोना नोडल अधिकारी

वैद्यकीय महाविद्यालयाव्यतिरिक्त उर्वरित जिल्ह्यात दररोज १० टन ऑक्सिजन लागत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ऑक्सिजनची मागणी दुप्पट झाली आहे. धुळे शहरातीलच एका उत्पादकाकडून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू आहे.

- विजय जाधव, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन