दिव्यांग निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:57+5:302021-04-06T04:34:57+5:30

येथील ग्रामपंचायतीच्या सन२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी अपंग कल्याण निधी म्हणून लाभार्थींना धनादेश स्वरूपात वाटप करण्यात ...

Disbursement of Disability Fund | दिव्यांग निधीचे वाटप

दिव्यांग निधीचे वाटप

येथील ग्रामपंचायतीच्या सन२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या उत्पन्नाच्या पाच टक्के निधी अपंग कल्याण निधी म्हणून लाभार्थींना धनादेश स्वरूपात वाटप करण्यात आला. यावेळी ३२ लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे ६४ हजार रुपयांचे वाटप धनादेशाच्या माध्यमातून करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले, एस.टी. महामंडळाचे सेवानिवृत्त विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, ग्रामपंचायतीचे सदस्य विष्णू गायकवाड, अशोक मोहिते, प्यारेनबी पिंजारी, बाळू ठाकरे, सुंदरबाई देवरे, मिलिंद देवरे, बाबा देवरे,भगवान मोहिते, जगन्नाथ देवरे, प्रतिभा साळुंखे, पंकज माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी केले. आभार भगवान मोहिते यांनी मानले. याप्रसंगी लिपिक रवींद्र देवरे, कर्मचारी प्रकाश खैरनार, भूषण चव्हाण, सचिन मोहिते, सिद्धार्थ मोहिते, प्रवीण देवरे, विजय देवरे, सतीश देवरे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Disbursement of Disability Fund