शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

धुळेकरांना पडला कोरोनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST

लॉकडाऊननंतर नियम व अटींवर व्यवहार सुरळीत झाल्याने शहर पुन्हा गजबजू लागले आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यावर ...

लॉकडाऊननंतर नियम व अटींवर व्यवहार सुरळीत झाल्याने शहर पुन्हा गजबजू लागले आहे़ त्यामुळे शहरातील अनेक भागांतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे़ शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आतापर्यंत १९३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे़ तर ३९५ कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे़ शहरात कोरोनाचा संर्सग रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे़ तरीही नागरिकांना शिस्त लागत नसल्याचे दिसून येत आहे़

शहरात वाहतुकीला बंदी घालण्याची गरज

व्यावसायिकांना सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची वेळ निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची सहसा सकाळी ११ ते सांयकाळी ५ पर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मनपाने जुन्या आग्रारोडवर किमान तात्पुरती व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे़ त्याचप्रमाणे आग्रारोडवर रिक्षा, चारचाकी व अवजड वाहनांना काही दिवसांसाठीतरी बंदी करणे आवश्यक आहे़ बाजारात दुचाकी व चारचाकी वाहने रस्ता अडवितात़ त्यामुळे बाजारात खेरदीसाठी आलेल्या नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होते़ त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही़

आग्रा रोडलगत असलेल्या बोळींमध्ये, महापालिकेच्या आवारात तसेच मनपा शाळा क्रमांक पाच, जिल्हा बँकेच्या मागील बाजूच्या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मनपाने पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे़

शुक्रवारी बाजारात गर्दी

लाॅकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवारी नागरिकांनी खरेदीसाठी जुना आग्रा रोड, पाच कंदील, पारोळारोड, कराचीवाला खुंट अशा परिसरात सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती़ याचवेळी महाराणा प्रताप चौक ते फुलवाला चौक परिसरात गर्दीत चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती़ त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. खरेदीसाठी आलेले अनेकजण विनामास्क बिनधास्त फिरताना आढळून आले़. महापालिकेकडून कारवाई केली जाते. मात्र, ही कारवाई केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. आग्रारोडवरील दुकानांसमोर लागलेली दुचाकी वाहने, विक्रेत्यांनी लावलेल्या हातगाड्या, लोखंडी जाळ्या, भररस्त्यात लावण्यात आलेल्या रिक्षा व चारचाकी वाहने, दुकानांचे फलक, कमानी यामुळे पार्किंगचा प्रश्न बिकट होऊन बसला आहे़

डिस्टन्स ठेवण्याची गरज

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने तोंडाला मास्क व किमान अंतर ठेवण्याची गरज आहे़ मात्र, बहुसंख्य व्यक्ती आजही रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे दिसून येते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.

२२०० कोरोना मुक्त

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र, दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.