Dhule: धुळ्यातील चाळीगावरोड चौफुलीवर मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन

By अतुल जोशी | Updated: September 8, 2023 16:11 IST2023-09-08T16:11:19+5:302023-09-08T16:11:35+5:30

Dhule News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला. शहरातील चाळीसगावरोड चौफुलीवर चक्काजाम करीत रास्तारोको आंदोलन केले.

Dhule: Chakkajam protest by Maratha community on Chaligaon Road Chauphuli in Dhule | Dhule: धुळ्यातील चाळीगावरोड चौफुलीवर मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन

Dhule: धुळ्यातील चाळीगावरोड चौफुलीवर मराठा समाजातर्फे चक्काजाम आंदोलन

- अतुल जोशी
धुळे - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला. शहरातील चाळीसगावरोड चौफुलीवर चक्काजाम करीत रास्तारोको आंदोलन केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे हे आंदोलन करीत आहेत.पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला. त्यामुळे समाजबांधव आक्रमक झाले असून, मराठा समाजाला कोणत्याही अटीशर्थीविना आरक्षण मिळावे अशी समाजाची मागणी आहे.

आरक्षणासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता चाळीसगाव रोड चौफुलीवर मराठा समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंना वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले.

शिंदखेड्यात बंद
दरम्यान मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिंदखेडा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळा. 

Web Title: Dhule: Chakkajam protest by Maratha community on Chaligaon Road Chauphuli in Dhule