मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST2021-04-19T04:33:31+5:302021-04-19T04:33:31+5:30

ग्रामीण भागात उत्साह धुळे : महानगरांमध्ये रोजगारासाठी गेलेले कुटुंब कोरोनामुळे गावी परत येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचे वातावरण सध्या ...

Demand increased | मागणी वाढली

मागणी वाढली

ग्रामीण भागात उत्साह

धुळे : महानगरांमध्ये रोजगारासाठी गेलेले कुटुंब कोरोनामुळे गावी परत येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचे वातावरण सध्या गजबजलेले दिसत आहे. शेतशिवारांमध्ये काम असल्याने रोजगारही मिळाल्याने समाधान आहे.

धुळीचे साम्राज्य

धुळे : वाडीभोकर रस्ता भूमीगत गटारीच्या कामासाठी खोदण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून या रस्त्यावर काम सुरू आहे. मोठमोठे खड्डे तर पडलेच आहेत. परंतु धुळ देखील मोठ्या प्रमाणात साचली आहे. वाहने जाताना धुळ उडते.

सीसीटीव्ही बसवा

धुळे : शहरातील संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. दंगली घडल्यानंतर या उपाययोजनांची आवश्यक अधिक दिसून आल्याने पक्ष, संघटनांनी अनेकदा मागणी केली.

पाण्यासाठी पायपीट

धुळे : शहराचा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला आहे. उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी जास्त लागते म्हणून नियोजन कोलमडले आहे. पांझरा नदीकिनारी राहणाऱ्या एका व्यक्तीला डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणावे लागले.

Web Title: Demand increased