ट्रकखाली चेंगरला जाऊन सहचालकाचा मृत्यू

By Admin | Updated: March 19, 2017 00:36 IST2017-03-19T00:36:16+5:302017-03-19T00:36:16+5:30

नंदुरबारनजीकची घटना : मयत मुकटी येथील रहिवासी, चालकाविरुद्ध गुन्हा

The death of the operator by going to the truck under the truck | ट्रकखाली चेंगरला जाऊन सहचालकाचा मृत्यू

ट्रकखाली चेंगरला जाऊन सहचालकाचा मृत्यू

नंदुरबार : ट्रकचे टायर तपासणी करताना अचानक चालकाने ट्रक सुरू केल्याने त्याखाली दबला जाऊन सहचालकाचा मृत्यू झाल्याची घटना नंदुरबार-निझर रस्त्यावर १७ रोजी  रात्री घडली. याबाबत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला        आहे.
जळगाव जिल्ह्यातून ट्रकमध्ये (एमएच १८-ए ९७९३) कापूस भरून  देविदास लोटन जाधव रा.दळवेल, ता.पारोळा व सहचालक राजेंद्र हिंमत पाटील (४३) रा.मुकटी, ता.धुळे हे निझरकडे जात होते.
नंदुरबार ते निझर दरम्यान टायर तपासणीसाठी ट्रक थांबविण्यात आली. त्यावेळी चालक  लघुशंकेसाठी गेल्यावर सहचालकाने टायर तपासणी केली. मागील चाकाखाली टायर तपासणी करीत असताना चालक देविदास लोटन जाधव यांनी अचानक ट्रक सुरू केला. त्यामुळे राजेंद्र हिंमत पाटील हे चाकाखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत भैया रमेश पाटील रा.मुकटी, ता.धुळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून देविदास लोटन जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री उशिरा शवविच्छेदनानंतर राजेंद्र पाटील यांचा मृतदेह मुकटीला रवाना करण्यात आला.

Web Title: The death of the operator by going to the truck under the truck