शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर आगाराला रोजचा ८ लाखांचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:35 IST

ब्रेक द चेन मिशनअंतर्गत १५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अनेकांनी घरातच बसणे पसंत केले आहे. तसेच ...

ब्रेक द चेन मिशनअंतर्गत १५ एप्रिलपासून मिनी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अनेकांनी घरातच बसणे पसंत केले आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकही शहरात खरेदीसाठी येणे आता कमी झाले. अनेकांनी लॉकडाऊन होणार या भीतीने अगोदरच घरातील सामान भरून ठेवले आहे, तर दुसरीकडे शाळा, महाविद्यालये सध्या बंद आहेत.

गेल्या वर्षी कोरोना काळात एस. टी.ने मालवाहतूक केली. पण, यावेळी अद्याप तशी परिस्थिती उद्भवलेली दिसून येत नाही. त्याशिवाय बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांना या एस. टी. बस सोडण्यासाठी जात असत. पण, यावेळी मजुरांनी अगोदरच गावी जाणे पसंत केल्याचे दिसून आले. या संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत.

लॉकडाऊनपूर्वी शिरपूर आगाराच्या ४३० बस फेऱ्या सुरू होत्या. एस. टी. फेऱ्या बंद असल्याने दिवसाला एस. टी.चे ८ लाख एवढे नुकसान होत आहे. मात्र, पुरेसे प्रवासी मिळाल्यास धुळे व जळगाव येथे १-२ फेऱ्या मारल्या जात असून, त्यातून दररोज २० हजाराचे उत्पन्न आगाराला मिळत आहे. ब्रेक द चेन मिशनअंतर्गत लोकांनी घरीच राहाणे पसंत केल्याने हा फटका बसला आहे.

आगारासमोर प्रश्न उभा़

एसटी प्रशासनाने धुळे येथे जाण्यासाठी २ फेऱ्या, तर जळगाव येथे जाण्यासाठी १ फेरी सुरू केली आहे. मात्र, तेही पुरेशी प्रवासी संख्या मिळाल्यास गाडी सुटते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असल्याने प्रवासीच नसतील तर एस. टी. कोणासाठी सोडायची, असा प्रश्न येथील आगारासमोर उभा ठाकला आहे. अपुऱ्या प्रवासी संख्येमुळे इंधन खर्चाला सामोरे जाण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या आगाराच्या ९४ बसेस आहेत. आवश्यक असलेल्या चालक - वाहकांनाच ड्युटीवर बोलावले जाते. अन्य कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे पगार दिला जात आहे. बाकीच्या सर्वांना सद्यस्थितीत घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.