कापडणे येथे कोविड सेंटर सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:33 IST2021-04-12T04:33:45+5:302021-04-12T04:33:45+5:30

कापडणे येथील गढीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ही कोविड प्रतिबंधक बैठक झाली. या बैठकीला सरपंच सोनीबाई भिल, ग्रामपंचायत ...

Covid Center should be started at Kapdane | कापडणे येथे कोविड सेंटर सुरू करावे

कापडणे येथे कोविड सेंटर सुरू करावे

कापडणे येथील गढीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत ही कोविड प्रतिबंधक बैठक झाली. या बैठकीला सरपंच सोनीबाई भिल, ग्रामपंचायत सदस्य आक्काबाई भिल, जितू भिल, अंजन पाटील, महेश पाटील, हरीश पाटील, प्रवीण पाटील, कपिल बोरसे, अमोल बोरसे, मनोहर आसाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नवल नामदेव पाटील व गावात चोवीस तास आरोग्य सेवा देणारे खासगी दवाखान्याचे डॉ. भानुदास पाटील, डॉ. सुरेश माळी, डॉ. महेंद्र भामरे, जगन्नाथ पाटील, दत्तात्रय पाटील, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आदी उपस्थित होते.

कापडणे गावात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात यावे. याठिकाणी कोविड सेंटर उभारल्यास परिसरातील धनूर, लोणकुटे, कौठळ, देवभाने येथील रुग्ण गावापासून जवळच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊ शकतील. त्यामुळे रुग्णांचे हाल कमी होतील. म्हणूनच गावात कोविड सेंटर सुरू करणे गरजेचे असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. यासाठी प्रशासनाला कापडणे ग्रामपंचायतीतर्फे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगण्यात आले.

कापडणे येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी, आमदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी गावात कोरोनाचा सामना व प्रतिबंध कशाप्रकारे करण्यात यावा, याविषयी चर्चा करण्यात आली. संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली तर कोरोनाला आळा घालण्यासाठी व गावात उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

Web Title: Covid Center should be started at Kapdane