नगरसेवक पुत्रावर तिसरा गुन्हा दाखल

By Admin | Updated: April 29, 2017 02:16 IST2017-04-29T02:16:08+5:302017-04-29T02:16:08+5:30

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी महिला महापौरांसंदर्भात बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी नगरसेवकपुत्र देवा चंद्रकांत

Corporator son filed a third case | नगरसेवक पुत्रावर तिसरा गुन्हा दाखल

नगरसेवक पुत्रावर तिसरा गुन्हा दाखल

धुळे : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर माजी महिला महापौरांसंदर्भात बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी नगरसेवकपुत्र देवा चंद्रकांत सोनारसह ग्रुप अ‍ॅडमिनविरुद्ध आझादनगर पोलिसात गुरुवारी रात्री तिसरा गुन्हा दाखल झाला आहे़
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हिलाल लालजी माळी (रा़ सुभाषनगर, जुने धुळे) यांनी आझादनगर पोलिसात तक्रार दाखल दिली होती. त्यानुसार देवा सोनारसह ग्रुप अ‍ॅडमिन महेश बागुल या दोघांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Corporator son filed a third case