जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळायला एक वर्ष पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:35+5:302021-04-10T04:35:35+5:30

धुळे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना धुळे जिल्हा मात्र काही दिवस सुरक्षित होते. मात्र एप्रिल महिन्यात कोराेनाने जिल्ह्यात ...

Completed one year to find the first patient in the district | जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळायला एक वर्ष पूर्ण

जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळायला एक वर्ष पूर्ण

googlenewsNext

धुळे : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना धुळे जिल्हा मात्र काही दिवस सुरक्षित होते. मात्र एप्रिल महिन्यात कोराेनाने जिल्ह्यात शिरकाव केला. गेल्यावर्षी १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण सापडला. मात्र त्याचा मृत्यू झाला. पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळायला एक वर्ष पूर्ण झाले आहे. एका वर्षात बाधिताच्या आकड्याने ३० हजारांचा आकडा पार केला असून, ही चिंतेची बाब झालेली आहे.

गत वर्षी १० एप्रिल रोजी साक्री येथील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता, मृत्यूनंतर त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. साक्री येथील पहिल्या बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच धुळे शहरात आढळलेल्या पहिल्या रुग्णांचाही मृत्यू झाला होता. सुरुवातीला बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने जुलै ते सप्टेंबर महिन्यात उच्चांक गाठला होता. धुळे शहर व शिरपूर तालुका पहिल्या टप्प्यात मोठे हॉटस्पॉट ठरले होते. कोरोनाची पहिली लाट नियंत्रणात आल्यानंतर आता दुसरी लाट आली आहे. वर्षभरात ३० हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, ४७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दहा हजार रुग्ण व्हायला लागले होते १५० दिवस,

तिसरे दहा हजार रुग्ण आढळले केवळ २२ दिवसांत -

गतवर्षी १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर दहा हजार रुग्णांचा टप्पा ओलांडायला १५० दिवस लागले होते. दि. ७ सप्टेंबर रोजी एकूण बाधित रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला होता. तसेच ऑक्टोबरनंतर रुग्णांच्या संख्येत घसरण झाली होती. त्यामुळे पुढील दहा हजार रुग्ण आढळायला १९१ दिवस लागले होते. यंदा १७ मार्च रोजी एकूण बाधित रुग्णांच्या संख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला. रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा गाठला तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र झाली होती. त्यामुळे पुढील १० हजार रुग्ण केवळ २२ दिवसांतच आढळले आहेत. १७ मार्च रोजी २० हजार १२८ इतकी असलेल्या एकूण बाधित रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

ग्राफ साठी -

* जिल्ह्यातील पहिला रुग्ण आढळला -

१० एप्रिल २०२०

* रुग्णसंख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला

७ सप्टेंबर २०२०

* रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा ओलांडला

१७ मार्च २०२१

* रुग्णसंख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला

९ एप्रिल २०२१

पहिल्या लाटेला समर्थपणे तोंड देणारी आरोग्य यंत्रणा दुसऱ्या लाटेत अडखळली -

मागील वर्षी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेने चोख कामगिरी बजावली होती. मात्र दुसरी लाट अधिक तीव्र असल्याने तसेच रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात आढळल्याने आरोग्य यंत्रणेची त्रेधातीरपट उडत असल्याचे चित्र आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनसह, ऑक्सिजन व कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच व्हेंटिलेटर बेड मिळावा यासाठी नातेवाइकांच्या रुग्णांची भटकंती सुरू आहे.

कोरोना प्रयोगशाळेत स्वयंचलित यंत्रणा, क्षमता वाढली -

मागील वर्षी देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर परदेशातून परतणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांची संख्या वाढली होती. परदेशातून आलेल्या नागरिकांचे हिरे महाविद्यालयात स्वॅब घेतले जात होते. त्यानंतर ते तपासणीसाठी पुणे येथे पाठविले जात होते, मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २९ मार्च रोजी कोरोना प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला एका दिवसांत केवळ २०० स्वॅब तपासणीची क्षमता होती. आता मात्र स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित केल्याने एका दिवसांत १ हजार स्वॅब तपासण्याची क्षमता झाली आहे. एक वर्षाच्या कालावधीत १ लाख २० हजार नागरिकांच्या स्वॅबची तपासणी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

पहिल्या तीन रुग्णांचा मृत्यू, चौथा रुग्ण ठणठणीत

- जिल्ह्यात आढळलेल्या साक्री येथील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. तसेच त्यानंतर आढळलेल्या दोन रुग्णांचाही मृत्यू झाला होता. मात्र चौथे रुग्ण असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील बाह्मणे येथील अनुसयाबाई पाटील या ७० वर्षीय आजींची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी १४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांना गॅरी सोडण्यात आले होते.

Web Title: Completed one year to find the first patient in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.