शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीवाढीसाठी आयुक्त मुख्यमंत्र्यांकडे?

By admin | Updated: March 2, 2015 13:09 IST

घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करु असे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी सांगितले.

 धुळे : महानगरपालिकेच्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय योग्य नसून मनपाला सुस्थितीत आणण्यासाठी महासभा ठराव विखंडनासह पाणीपट्टीत किमान दुप्पट वाढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त के.व्ही. धनाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. महानगरपालिकेच्या २0 फेब्रुवारीला झालेल्या महासभेत घरगुती पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापौर जयश्री अहिरराव व सदस्यांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला प्रखर विरोध केल्याने जनभावना लक्षात घेऊन पाणीपट्टीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर व्यावसायिक पाणीपट्टीत काही प्रमाणात वाढ करण्यात आली होती. परंतु महासभेपूर्वीच प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी पाणीपट्टीत वाढ होणे गरजेचे असल्याने अपेक्षित वाढ न झाल्यास महासभेच्या ठरावाचे विखंडन करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार घरगुती व व्यावसायिक पाणीपट्टीत किमान दोन हजार रुपयांची वाढ करावी, अशी मागणी तीन-चार दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांकडे करणार असून महासभा विखंडनाचा प्रस्तावही सादर करणार असल्याचे धनाड यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले. महासभेत व्यावसायिक वापरासाठी घेण्यात आलेले अर्धा इंची नळकनेक्शन असल्यास ते बंद करावेत, पाऊण इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी वार्षिक पाणीपट्टी ७ हजार ५३६ वरून १२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ इंची नळकनेक्शनसाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी १६ हजार ५५२ वरून २५ हजार करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. महासभेत पाणीपुरवठय़ाच्या संवेदनशील विषयावर बोलताना महापौर जयश्री अहिरराव यांनी, शहरात राबविण्यात येत असलेल्या १३६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामांतर्गत प्रत्येक नळावर मीटर बसविण्यात येत असून त्यानंतर मीटरप्रमाणे घरगुती नळधारकांना बिल आकारण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. परंतु आयुक्त के.व्ही. धनाड यांनी कर्मचार्‍यांसह प्रत्येकाचीच अपेक्षा महानगरपालिकेकडून विकासकामे, थकबाकीची आहे. प्रभारी आयुक्त या नात्याने प्रत्येकाला तोंड द्यावे लागत असल्याने उत्पन्नवाढ गरजेचीच आहे. त्यामुळे महासभेचा ठराव विखंडित करून पाणीपट्टीत योग्य ती वाढ करवून घेणार असल्याचे प्र. आयुक्त धनाड म्हणाले. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात मुख्यमंत्र्यांसह सचिवांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असून मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील, असे प्र. आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले व सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. शहरात घरगुती पाणीपट्टी वर्षाला केवळ १२00 रुपये आकारली जाते. राज्यात कोठेही इतकी कमी पाणीपट्टी आकारली जात नाही. ही रक्कम अत्यंत कमी असून नागरिकांनी किमान ४000 रुपये पाणीपट्टी भरल्यास दररोज पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी द्यायला तयार असल्याचेही आयुक्त धनाड यांनी स्पष्ट केले.