शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत वीजपुरवठ्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:11 IST

मुख्य वीज वाहिन्या आठवड्यात तीन वेळा तुटल्या : स्वस्तधान्य दुकानांपासून बँकांपर्यंतची कामे ठप्प

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वीज उपकेंद्र असून देखील विजेचा लपंडाव होतो. सुराय चौफुलीवर आठवड्यातून तीनदा मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्या. भरदिवसा तारा तुटत असल्यामुळे जीवीत हानी होण्याचा गंभीर धोका उद्भवू शकतो. तर विजे अभावी स्वस्तधान्य दुकानापासून ते बँकेच्या शाखेपर्यंत विविध कामांसाठी नागरिक ताटकळत असतात. याबाबत वरिष्ठांनी योग्य दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्पात ३३/११ केव्ही क्षमतेचे विद्युत विज उपकेंद्र असून स्वतंत्र तीन फिडर आहेत. मात्र हे ‘केंद्र कुचकामी आहे की कर्मचारी’ हा सध्या शोधाचा विषय परसरात बोलला जात आहे. पाऊस असो किंवा नसो वीज पुरवठा सतत खंडीत होतो. गावात वीज उपकेंद्र असून काय उपयोगाचे अशी नागरिकांमध्ये चर्चा होते.सुराय रस्ता चौफुली येथे नेहमी वर्दळ असते. सुराय, चुडाणे, अक्कलकोस व कर्ले, परसोळे, साक्रीकडे जाणारे प्रवासी तसेच जवळच माध्यमिक शाळा असून या शाळेच्या पटांगणाजवळू गेलेल्या सुराय रस्ता चौफुलीवरच्या मुख्य वीज वाहिनीच्या तारा या आठवड्यात तीन वेळा तुटल्या. भरदिवसा या तारा तुटत असून जीवीत हानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.वीज पुरवठा खंडीत होताच येथील सेंट्रल बँकेची कनेक्टीव्हीटी सुद्धा खंडीत होते. तसेच सरकार मान्य स्वस्तधान्य दुकानावरील इलेक्ट्रॉनिक वजन काटा बंद पडून अक्षरश: धान्य दुकानापासून ते बँकेच्या शाखेपर्यंत नागरिक ताटकळतांना दिसून येतात. वेळेवर काम होत नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घ्यावी अशी मालपूर ग्रामस्थांची मागणी  आहे.

टॅग्स :Dhuleधुळे