शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चितोडला दोन गट आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:46 IST

कुºहाडीसह शस्त्रांचा वापर : ८ जखमी, १० जणांविरुध्द गुन्हा, तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील चितोड गावातील यात्रेत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन दोन कुटुंबांमध्ये बुधवारी दुपारी हाणामारीची घटना घडली़ यात सर्रासपणे कुºहाडीसह धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने तणाव निर्माण झाला होता़ यात ८ जण जखमी झाले असून १० जणांविरुध्द धुळे तालुका पोलिसात रात्रीच गुन्हा दाखल नोंदविण्यात आला़ रजूबाई उत्तम सोनवणे (४५, रा़ चितोड) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन १५ दिवसांपुर्वी गावात झालेल्या यात्रेत भांडण झाले होते़ त्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ व धमकी देतात़ याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्याचा राग येऊन नरेंद्र भगवान मोरे, शिवा भगवान मोरे, समाधान शरद मोरे या संशयितांसह अन्य दोन जण (सर्व रा़ चितोड) यांनी बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रजूबाई सोनवणे यांच्या घरात घुसले़ त्यांनी लाकडी दांडक्याने, हाताबुक्यांनी रजूबाईसह पती उत्तम गुलाब सोनवणे व दोघा मुलांना मारहाण केली़ उत्तम सोनवणे यांच्या खिशातून १५ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले़ मारहाणीत रजूबाईसह उत्तम सोनवणे, महेंद्र सोनवणे, दिनेश सोनवणे हे चौघे जखमी झाले आहेत़ याप्रकरणी नरेंद्र मोरे सह ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणात दुसरी फिर्याद वंदनाबाई भगवान मोरे (४८, रा़ चितोड) या महिलेने फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, वंदनाबाई यांच्या मालकीची बकरी दिनेश उत्तम सोनवणे हा हाकलून घेऊन गेला होता़ त्याबद्दल त्याला विचारपूस केली असता त्याचे त्याला वाईट वाटले़ त्यानंतर बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दिनेश उत्तम सोनवणे, उत्तम गुलाब सोनवणे, महेंद्र उत्तम सोनवणे, रजूबाई उत्तम सोनवणे यांनी वाद घातला़ शिवीगा केली़ हाताबुक्यांनी मारहाण केली़ वंदनाबाईला सोडविण्यासाठी तिचा पती भगवान रामसिंग मोरे, नरेश भगवान मोरे, उषाबाई भगवान मोरे, समाधान शरद गायकवाड हे आले असता त्यांना कुºहाड, लोखंडी पाईप व भाला यांच्या सहाय्याने मारहाण केली़ त्यात या पाचही जणांना दुखापत झाली़ यावरुन दिनेश सोनवणेसह ५ जणांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ गावात तणावाचे वातावरण आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी