शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

शिंदखेड्यात रसायनशास्त्र विषय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:48 IST

८२ प्राध्यापकांचा सहभाग : एसएसव्हीपीएस कॉलेजमध्ये आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तृतीय वर्ष विज्ञान वर्गाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासूनच्या रसायनशास्त्र विषयाच्या सीबीएससी पद्धतीप्रमाणे अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा एसएसव्हीपीएस महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.टी. पावरा यांनी केले. अध्यक्षस्थानी प्रफुल्लकुमार सिसोदे होते. याप्रसंगी उपाध्यक्ष अशोक पाटील, संचालक सुरेश देसले, उपप्राचार्य प्रा.सी.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही. बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यशाळेत विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.टी. पावरा यांनी अभ्यासक्रमात होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाची प्रगती व सुविधांविषयी माहिती दिली. रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.एस.एस. राजपूत यांनी तृतीय वर्ष रसायनशास्त्र वर्गाच्या अभ्यासक्रमाचा आराखडा व अभ्यासक्रम बदलत्या युगानुसार पारंपारिक अभ्यासक्रम न ठेवता कौशल्यपूर्ण व यू.जी.सी.च्या मार्गदर्शक अभ्यासक्रमानुसार आपला अभ्यासक्रम तयार करावा, असे सांगितले. अभ्यासक्रम तयार करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विचारात घेऊन रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करावा, असे आवाहन प्रफुल्लकुमार सिसोदे यांनी केले. कार्यशाळेत ८२ प्राध्यापक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.एस. पाटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्रा.एस.एस. सनेर यांनी केले.रसायनशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा.डॉ.एस.एस. राजपूत यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप झाला. समारोपीय अध्यक्षपद प्रा.डॉ. एस.एस. राजपूत यांनी भूषविले. यावेळी डॉ.एस.एस. राजपूत यांनी भविष्यात येणारा नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व रोजगार निर्मिती करणारा असावा, असे सांगितले. कार्यशाळेसाठी प्रा.एस.एस. सनेर, प्रा.डॉ.पी.आर. पाटील, डॉ.एस.एस. पाटोळे, प्रा.जे.जी. पाटील, प्रा.पी.एम. महाले, प्रा.योगेश अहिरराव, प्रा.डॉ. तुषार पाटील, प्रा.व्ही.एम. केशे, प्रा.आर.टी. जाधव, प्रा.आर.पी. चव्हाण, प्रा.डॉ. यू.पी. खैरनार, प्रा.तुषार करंके, रवींद्र देसले, युवराज बोरसे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे