गुणवंत विद्यार्थिनींना धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:21+5:302021-04-20T04:37:21+5:30

शासनाचे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ धोरण आहे. यात मुलीची संख्या वाढतानाच त्यांनी शिक्षणात पण भरारी घ्यावी, हा उद्देश आहे. यात ...

Checks to meritorious students | गुणवंत विद्यार्थिनींना धनादेश

गुणवंत विद्यार्थिनींना धनादेश

शासनाचे ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ धोरण आहे. यात मुलीची संख्या वाढतानाच त्यांनी शिक्षणात पण भरारी घ्यावी, हा उद्देश आहे. यात शाळेतील विद्यार्थिनींची हजेरी व गुणवत्ता ग्राह्य धरून दहावी व बारावी या परीक्षेत जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन म्हणून रोख पारितोषिक दिले जाते. आरडीएमपी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा-बारावीत विज्ञान शाखेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रीष्मा अशोक गुजराथी, खुशी सुनील अग्रवाल, युतिका देवेंद्र नागरे यांना प्रत्येकी २ हजार २७२ रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. हा धनादेश गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपगट शिक्षणाधिकारी गायकवाड, विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गिरीश बागुल, प्राचार्य डी.एन. जाधव आदी उपस्थित होते. सदर विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, आमदार जयकुमार रावल, सचिव सी.एन. राजपूत, शालेय प्रशासन सचिव ललितसिंह गीरासे, विकासाधिकारी आर.टी. गिरासे आदींनी कौतुक केले.

Web Title: Checks to meritorious students